Sapiens- Yuval Noah Harari – book review |सेपियन्स|

         Yuval Noah Harari  सांगतात की सुमारे एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या कमीत कमी 6 जाती राहत होत्या. पृथ्वी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ग्रहावर सुमारे 3.8 अब्ज वर्षांपूर्वी काही रेणू एकत्र आले आणि त्यांच्यातून विशेषतः मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रचना असलेल्या सजीवांची निर्मिती झाली. सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी होमो सेपिअन या सजीवांच्या जातीनं याहूनही अधिक गुंतागुंतीच्या संस्कृती नामक रचनांची निर्मिती केली. या मानवी संस्कृतीचा उत्तरोत्तर जो विकास होत गेला त्याला इतिहास असं संबोधल जायला लागलं.
       

               इतिहासाला आकार देण्यासाठी तीन महत्वाच्या क्रांत्या कारणीभूत ठरल्या. सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी बोधात्मक क्रांतीनं इतिहासाची सुरवात झाली. सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी आलेल्या कृषिकांतीनं त्याला गती देण्याचं काम केल आणि केवळ पाचशे वर्षपूर्वी सुरू झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनं कदाचित इतिहासाची अखेर होऊन काहीतरी पूर्णपणे वेगळंच उदयाला येऊ शकेल. या तीन क्रांतिनी मानवावर आणि त्याच्या बरोबरीनं भूतलावर राहणाऱ्या इतर सजीवांवर काय परिणाम झाला याची सखोल माहिती आपल्याला Yuval Noah Harari सांगतात

            पुस्तकाच्या सुरवातीलाच आपल्याला इतिहासाची कालरेषा वाचायला मिळते म्हणजे काय तर  13.5 अब्ज वर्षांपूर्वी काय जन्माला आले आणि कशाची निर्मिती झाली. पृथ्वीची निर्मिती किती वर्षापूर्वी झाली. पहिला जीव कधी निर्माण झाला. होमो या कुळातील प्राण्यांची आफ्रिकेत उत्क्रांती कधी झाली. अग्नीचा शोध, इथपासून ते भविष्यात जीवांची निर्मिती नैसर्गिक निवडीतून न होता कश्या प्रकारे होणार या सगळ्यांचा एक धावता आढावा आपल्याला वाचायला मिळतो.
               एके काळी आपल्याला बऱ्याचशा बंधुभगिनी होत्या. गेल्या दहा हजार वर्षांपासून आपल्या सभोवताही आपल्याला आपली एकच जात दिसत होती, म्हणून आपण फक्त मानव आहोत असा विचार करण्याची सवय आपल्याला लागली. तरीही मानव या शब्दाचा खरा अर्थ ‘होमो प्रजातीतील प्राणी ‘ असा आहे. या प्रजातीत होमो सेपियन्स खेरीज इतरही जाती होत्या.

Yuval Noah Harari  सांगतात की सुमारे एक लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानवाच्या कमीत कमी 6 जाती राहत होत्या.

        1) अस्ट्रेलोपीथिकस -25 लाख वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेत अस्ट्रेलोपीथिकस (दक्षिणेचा महावानर) या प्रजातीच्या महावानरापासून मानव प्रथम उत्क्रांत झाला.  2) निअँडरथेलेसिन्स- म्हणजे खोऱ्यातील माणूस हा सेपियन्स पेक्षा वजनाने भारी आणि पिळदार स्नायू असलेला होता. 3)होमो इरेक्टस(ताठ कण्याचा माणूस) -हा जवळपास 20 लाख वर्ष पृथ्वीवर होता. आपल्या सध्याच्या म्हणजे होमो सेपियन्स या जातील हा विक्रम मोडता येईल की त्याआधीच आपली जात नष्ट होईल हीच शंका आहे.  4) होमो सोलेसीन्स-सोलो खोऱ्यातील माणूस.  5 ) होमो फ्लोरेसिऐसीन्स-या जातीची माणसं खुजी होती ती का झाली ते पुस्तकात सांगितलं आहेच. 6)होमोरुडोल्फेसिन्स 7) होमो इरगेस्टर आणि त्यानंतर होमो सेपियन्स अश्या प्रकारे मानवाच्या जातींची उत्क्रांती झाली.

         यानंतर कृषिकांती झाली ती इतिहासातील सर्वात मोठी फसवेगिरी कशी ठरली. त्यानंतर माणसाचं एकीकरण कश्या पद्धतीने झालं. सुमारे 3000 हजार वर्षांपूर्वी पैसा कसा निर्माण झाला. जगात सर्वात पहिलं चलन म्हणून कशाचा वापर केला गेला. इतिहासातील पहिली नाणी, पैश्याची किंमत कशी ठरवली गेली. या सगळ्यांची सखोल माहिती आपल्याला या पुस्तकात मिळते.

           होमो सेपियन्स ने आपल्या मर्यादा पार केल्या आणि तो विनाशाकडे कश्या प्रकारे जात आहे या सगळ्या गोष्टीं या एकाच पुस्तकात वाचायला मिळतात.

कोणीतरी म्हटलेच आहे की ज्याला इतिहास माहीत नाही तो भविष्य काय घडवणार..
आपण आता ज्या प्रकारचे आहोत ते सर्व या आपल्या पूर्वजांमुळेच निदान आपला इतिहास माहीत करण्यासाठी तरी हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे..

पुस्तक खरेदी करायचे असल्यास amazon वर उपलब्ध आहे  खाली amazon ची लिंक दिली आहे  पेपेरबॅक एडिशन Rs 407(19%)सूट आणि किंडल एडिशन Rs193 (53%)सूट 
खालील लिंक किंवा पुस्तकावर  क्लिक करून आपण हे पुस्तक खरेदी करू शकता. 

https://amzn.to/2tx44R6

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "Sapiens- Yuval Noah Harari – book review |सेपियन्स|"

आपले मत कळवा