5 प्राचीन कथा|old ancient stories in marathi|

प्राचीन कथा
म्हातारपणाबद्दल 5 प्राचीन कथा

5 प्राचीन कथा|old ancient stories in marathi

म्हातारपण आणि मृत्यूबद्दल अनेक समाजांमध्ये अनेक
कल्पित कथा किंवा मिथ्य रूढ असतात. त्यांचा अभ्यास फार
अर्थपूर्ण ठरतो.

अनेक कल्पित कथांमध्ये एक समान धागा असतो. तो म्हणजे
कोणीतरी कोणाला तरी त्याचे तारुण्य परत दिले आहे. म्हणून
ती व्यक्ती किंवा तो समाज पुन्हा नव्या उमेदीने जगू लागलेला
आहे.

हे तारुण्य परत देणे म्हणजे काय ?

तर जुना काळ संपूर्णपणे नामशेष करणे आणि नव्या जीवनाला
नव्याने सुरुवात करणे.बाबिलोनियन संस्कृतीमध्ये किंवा बायबलमध्येही
अशी कल्पना आढळते. पूर आला आणि सर्व सृष्टी वाहून गेली.

नव्या जगात सगळ्या नव्या गोष्टी येतात.

आता हा पूर का आला याची वेगवेगळी कारणे वेगवेगळ्या कथांमध्ये
आढळतील हा भाग वेगळा.

इजिप्तमध्ये सूजनदेवता ओसिरिस हिच्यासंबंधी काही कथा आढळतात.
दरवर्षी सुगीच्या हंगामात ही देवता मरते आणि पेरणीच्या वेळी पुन्हा
जन्मते असा विश्वास तिकडे आहे. या साऱ्यांचा अर्थ एवढाच की,
आपण त्याच त्या जुनाट जगात जगत नाही, तर मध्ये मध्ये कधी तरी
जगाचे नूतनीकरण झाले, पुनर्जन्म झाला, जुना काळ नाहीसा झाला
अशी माणसाची भावना व्हावी. मग त्या गेल्या दिवसांची प्रतिमा जाळायची,

पुरायची किंवा सोडून द्यायची हे फक्त परिस्थिती सापेक्ष बदल
झाले. सत्तेवर येणाऱ्या राजाने स्वत:च्या नावाने कालगणना
सुरू करावयाची. नवीन शक, नवीन कॅलेण्डर काढायचे यातही
स्वामित्वाइतकीच जुना काळ पूर्णपणे विसरण्याची धडपड
आहे. “त्यांच्या सत्ता ग्रहणाने नवे युग सुरू झाले” यासारखी
भाषाही या बदलोत्सुक वृत्तीचीच द्योतक आहे.


जपानमधल्या शिंटो जमातीमध्ये देवळे आणि देवांच्या मूर्तीसुद्धा
ठरावीक काळानंतर नव्याने उभारण्यात येतात. काळामुळे
ओढवणाऱ्या -हासातून किंवा विनाशातून स्वतःला वाचवण्याचा हा
प्रतिकात्मक प्रयत्न म्हणावा लागेल.जपानमध्ये काही टोळ्यांमध्ये
विशिष्ट वयाला पोचलेल्या वृद्धाला मारून खाऊन टाकण्याची
प्रथा होती. त्याला खाऊन टाकले म्हणजे त्याचे ज्ञान, अनुभव
आपल्याला मिळेल ही एक कल्पना आणि तो उगाच भूत,
चेटूक वगैरे बनू नये हा दुसरा विचार.

म्हातारपणाविषयी ग्रीसची एक परी कथा आहे.

तिच्यामध्ये असे म्हटलेले आहे की, देवाने सजीवांची
जीवनमर्यादा ३० वर्षे इतकी ठरवली होती. माणसाला ती कमी
वाटली तर गाढव, कुत्रा आणि माकड या तीन प्राण्यांना इतक्या
आयुष्याचे काय करावे ते कळेनासे झाले. मग ते गेले देवाकडे.
त्यांनी देवापाशी गा-हाणे गायले.गाढव म्हणाले, “देवा माझे आयुष्य
१८ वर्षांनी कमी कर.”
कुत्रा म्हणाला, “देवा, माझे आयुष्य १२ वर्षांनी
कमी कर.” तर
माकड म्हणाले, “देवा, माझे आयुष्य १० वर्षांनी
कमी कर.”

माणूस काही समंजस नव्हता. मोठे आयुष्य म्हणजे
कंटाळा, प्रश्न, इतरांवर ओझं, परावलंबन या समस्या त्याला
मुळीच कळल्याच नाहीत.माणसाने हे सर्वांचे कमी केलेले
आयुष्य स्वत:साठी घेतले.

त्याची स्वत:ची ३० वर्ष, अधिक  गाढवाची १८ वर्ष, अधिक
कुत्र्याची १२ वर्ष, अधिक माकडाची १० वर्ष मिळून त्याचे आयुष्य
भले मोठे ७० वर्षांचे झाले.त्यापैकी  पहिली ३० वर्ष त्याची स्वत:ची
असतात. ती तो मजेत घालवतो, नंतर येतात गाढवाची १८ वर्ष, त्यात
तो खूप ओझी वाहतो, जबाबदाऱ्या पेलतो, कुटुंबाचे भरण-पोषण करतो.

नंतरची कुत्र्याची १० वर्षे जगताना तो बहुतांशी देखरेख करतो, कधी
कुरकुरतो – गुरगुरतो, घराच्या कोपऱ्यात जातो.या काळात त्याचे अस्तित्व
घराला जाणवते पण त्याचा फारसा उपयोग नसतो, घरातले स्थानही
कोपऱ्यातले किंवा द्वाररक्षणापुरते राहते. हा काळही संपला की शेवटची
१० वर्षे मात्र तो माकडासारखी घालवतो. लोक त्याची उपेक्षा करतात,
त्याला हसतात असा भाग ह्या कथेत आहे.

यातील सूत्रे दोन आहेत.

एक म्हणजे जगण्यातली माणसाची हाव दीर्घायुष्यसुद्धा त्याचे
त्याने ओढवून घेतलेय.
अन् दुसरी गोष्ट म्हणजे अविवेक, दीर्घायुष्याचे प्रश्न त्याला
कधी कळलेच नाहीत.

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "5 प्राचीन कथा|old ancient stories in marathi|"

आपले मत कळवा