वाचनाचा वेग वाढविण्यासाठी 7 उपाय| या 5 चुकीच्या वाचन सवयी टाळा..!|

वाचनाचे महत्त्व अपार आहे, कारण तसे त्याचे फायदेच
खूप आहेत.

(१) बहुश्रुतता

विपुल वाचनामुळे आपण बहुश्रुत बनतो. अनेक विषयांची
माहिती होते. अनेक प्रक्रिया, प्रवृत्ती आपल्याला माहीत होतात. अनेक
लेखकांचे जीवनविषयक दृष्टिकोन आपल्याला परिचित होतात.
अनेक लेखकांच्या शैलीचा परिचय होतो, ही शैली, ही मते आपला
दृष्टिकोन तयार करण्यास मदत करतात. आपले विचार प्रगल्भ होतात.
अनेक कसोट्यांवर आपण आपली मते तपासू शकतो. नव्याने घडवू
शकतो.

(२) जिज्ञासापूर्ती

लहानपणापासून आपल्याला अनेक क्षेत्रांविषयी कुतूहल
वाटत असते. परी, अप्सरा, राक्षस, चेटकीण, वीर राजपुत्र,
इत्यादींच्या कुतूहलातून आपण वीरकथा वाचत असतो.
रहस्यकथा, विज्ञानकथा, आपले कुतूहल पूर्ण
करीत असतात. थोरामोठयांची चरित्रे-व्यक्तींचा पराक्रम,
कर्तबगारी आपल्यासमोर ठेवत असतात. प्रवासवर्णन, वेगवेगळ्या देशांचा
इतिहास, भूगोल, संस्कृती परिचित करून देत असतात. अशा अनेक
प्रकारांतील साहित्य वाचनाने आपनी जिज्ञासा पूर्ण होते.

(३) भाषाकोश

विविध विषयांतील पुस्तकांच्या वाचनातून आपला
शब्दसंग्रह समृद्ध होतो. शब्दांचा योग्य तो अर्थ, म्हणी, वाक्प्रचार,
व्यंग्यार्थ, इत्यादींच्या परिचयाने आपली भाषिक क्षमता वाढते.

(४) कल्पनाशक्ती

साहित्य वाचत असताना लेखकाने उभ्या केलेल्या
व्यक्तिचित्रांबरोबर वाचकही स्वतंत्र कल्पनाचित्रे रंगवितो, त्यात
आपापल्या कुवतीनुसार भर घालतो.साहित्यात लेखकाबरोबरच
वाचकाच्या स्वतंत्र कल्पनासृष्टीला म्हणूनच महत्त्व असते. चांगला
आस्वाद म्हणजे वाचकाचे चांगले कल्पन

(५) संबंधित कौशल्ये

वाचनाशी संभाषण, लेखन, टिपण, वक्तृत्व अशी अनेक
अन्य कौशल्ये संबंधित आहेत. या कौशल्यांच्या विकासात
वाचनकौशल्याचा सिंहाचा वाटा आहे. स्वतंत्र लेखन करता
येण्यासाठी विपुल वाचन उपयुक्त ठरते. लिहिण्यापूर्वी वाचलेले
असेल तर टिपण काढणे सोयीचे जाते. संभाषणात पण आपल्या
वाचनातील संदर्भ, दाखले देऊन आपण आपली स्वतंत्र छाप पाडू
शकतो.

(६) संस्कृती-परंपरा

संस्कृती आणि परंपरा यांची ओळख वाचनातूनच होते.
सामाजिक, ऐतिहासिक कथा-कादंबऱ्या, नाटक, अन्य ललित
साहित्य, रूपांतरित, भाषांतरित साहित्य यातून त्या त्या भाषिक
समूहाच्या परंपरा, संस्कृती, परिचित होते. रीतीरिवाज, संकेत, भ्रम,
ग्रह, मिथके, रुढी यांचे ज्ञान अनेक लिखित मजकुरांतून होत असते.

चुकीच्या वाचनसवयी

वाचनाचे सर्व फायदे मिळावे असे आपणास वाटत असते.
पण काही वेळा आपल्या चुकीच्या सवयींमुळे वाचन नीट होत नाही.
अशा काही चुकीच्या सवयी पुढे दिल्या आहेत.

(१) वाचत असताना बऱ्याच लोकांना, वाचत असलेल्या
ओळीवर बोट अगर पेन्सिल ठेवून वाचण्याची सवय असते.
यामुळे वाचनवेग कमी होऊन परिणामी आकलनावरही
परिणाम होतो.

(२) बऱ्याच लोकांना मजकूर मोठ्याने वाचण्याची सवय असते.
मोठ्याने वाचण्याचेही काही फायदे आहेत; परंतु सर्वच वाचन
मोठ्याने करणे फायद्याचे नसते.
वाचन करत असताना, ओठांच्या, स्वरयंत्राच्या हालचाली
करण्यामुळेही वाचनवेगावर तसेच आकलनावर परिणाम
होतो.

(४) वाचन करत असतना नजर सतत पुढे सरकली पाहिजे. वाचत
असताना तुमची नजर पुनःपुन्हा वाचलेल्या शब्दांवर जाते
काय ते तपासून पाहा. तसे होत असल्यास ती सवय घातक
आहे.

(५) एखादे वाक्य वाचताना नजर मोजक्याच ठिकाणी स्थिरावली
पाहिजे. मंद गतीने वाचणारे वाचक एकच वाक्य खूप टप्पे
पाडून वाचत असतात. यामुळे आकलनात अडथळे येतात.
वाचनाची दिशा डावीकडून उजवीकडे अशी असते, पण
त्यासाठी काहीजण सतत डावीकडून उजवीकडे मान फिरवून
वाचतात. यामुळे वाचनवेग मंदावतो व तसे वाईट दिसते.
आपणास यापैकी कोणती सवय आहे? आपल्याच वाचनाचे
काळजीपूर्वक निरीक्षण करा.

चुकीच्या वाचन सवयींचे निराकरण करण्यासाठी

उपाययोजना

(१) आपल्याला ओळीवरून बोट/पेन/पेन्सिल फिरविण्याची
सवय असेल तर ती आपल्या वाचन वेगात अडथळा बनते.
म्हणून ही सवय जाणीवपूर्वक सोडली पाहिजे. प्रथमतः
चुकल्याचुकल्या- सारखे वाटेल. भीती वाटेल.
आत्मविश्वास वाटणार नाही. पण मनाचा हिय्या करून
कोणतेही बाह्य साधन न घेता वाचले पाहिजे. कारण हाताची
गती ही केव्हाही नजरेच्या गतीपेक्षा कमी असते. यामुळे
वाचनवेग मंदावतो.

(२)
मोठ्याने वाचल्यावर लक्षात राहते अशी आपली समजूत
असते. पण ती चुकीची आहे. संशोधनाने हे सिद्ध झाले
आहे की मोठ्याने उच्चार करून अगर मनातल्या मनात
शब्दोच्चार करून दर मिनिटास जास्तीत जास्त २५० ते ३००
शब्द वाचता येतात.पण शब्दोच्चारण मोठ्याने अगर मनात
न करता वाचल्यास (मनातल्या मनात) एका मिनिटात ८००
शब्ददेखील वाचले जाऊ शकतात. म्हणून केवळ नजरेने
वाचायला शिका.

(३) ओठांच्या, स्वरयंत्राच्या हालचालींची बाह्यतः आवश्यकता
नाही. याचा वाचनवेगावर परिणाम होतो. म्हणून मनातल्या
मनात हालचाल न करता वाचण्याचा सराव करा.

(४) वाचत असताना आपली नजर पुढे जाण्याऐवजी सतत मागील
शब्दांवर येत असेल तर वाचनवेगावर परिणाम होतोच पण
शब्द विसरणे / न वाचणे, ओळ वगळणे, चुकीचे वाचणे
यांसारख्या चुका होतात. यामुळे वाचनातील बराच वेळ वाया
जातो.

(५) वाचताना दृष्टीचा आवाका मोठा नसेल तर वाचन टप्याटप्याने
होते. मंदावते. यासाठी आपण आपल्या दृष्टीच्या आवाक्यात
सुधारणा करून हे टप्पे कमी करू शकतो. साधारणपणे एका दृष्टिक्षेपात
२.५ सेंटिमीटर ते ३.५सेंटीमीटर इतक्या रुंदीत मावणारा मजकूर आपण वाचू
शकतो. एकाच वेळेस किती शब्द वाचले जातात हे अक्षरांच्या आकारावर
अवलंबून असते. तसेच प्रत्येक वाचकाचा दृष्टीचा आवाका निरनिराळा
असतो. असे असले तरी आपण आपल्या दृष्टीचा आवाका प्रयत्नपूर्वक
थोडा वाढवू शकतो. दृष्टीचा आवाका वाढविण्याचा सराव करण्यासाठी
वृत्तपत्रामधील उभ्या स्तंभाचे वाचन करा. उभ्या स्तंभात नजरेची उभी
हालचाल होते. म्हणजे वरून खाली. नजरेची आडवी हालचाल
फारशी करावी लागत नाही. त्यामुळे उभ्या स्तंभातील वाचन भरभर
होते. अशा प्रकारे सराव करीत असतानाच मोठ्या वाक्यांचे अर्थपूर्ण
तुकडे पाडून वाचण्याचाही प्रयत्न करा. अशा सरावाने
मजकुरावर नजर टाकल्याबरोबर तात्काळ त्याचा अर्थ देखील
समजेल

(६)वाचनवेग वाढविण्याच्या प्रमुख उपायांपैकी एक
उपाय दृष्टीचा आवाका वाढविणे हा आहे. एक ओळ पूर्ण
वाचण्याकरिता दृष्टी एका शब्दावरून दुसऱ्यावर अशी उचलून
प्रत्येक शब्दावर स्थिरावत, एक एक शब्द वाचण्यास जास्त
वेळ लागतो. याउलट एखाद्या शब्दावर नजर स्थिरावून मागचे
पुढचेही शब्द त्याच दृष्टीच्या टप्प्यात पाहिले गेले तर प्रत्येक
शब्दावर दृष्टी स्थिरावून पुन्हा पुढे जाण्याचा वेळ वाचतो व
संपूर्ण ओळ फक्त दोन किंवा तीनच ठिकाणी नजर टाकून
सहजरित्या वाचता येते. सरावाने एकाच वेळेस दहापंधरा
अक्षरे अगदी झटकन वाचता येतात.

(७) काहींना वाचत असता मान फिरविण्याची सवय असते.
अशा अयोग्य सवयीमुळे आपली मान तर दुखतेच व
वाचनाचा वेगही कमी होतो. आपण वाचताना मान हलवीत
आहोत असे लक्षात आले ता कटाक्षाने हा अडथळा दूर करून
वरील उपाय केल्यास वाचनाचा वेग वाढतो व आकलनही होते.

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "वाचनाचा वेग वाढविण्यासाठी 7 उपाय| या 5 चुकीच्या वाचन सवयी टाळा..!|"

आपले मत कळवा