लैंगिक संबंधांविषयी समज गैरसमज|sex education in marathi

लैंगिक शिक्षण
image source - google

    कामेच्छा (Sexual urge) तसेच कामपूर्तीची इच्छा

(desire to satisfy the sexual urge) ही स्वाभाविक
आहे, नैसर्गिक आहे. कामपूर्ती, लैंगिक सुख हा जीवनातील
अनेक आनंदांपैकी एक आनंद आहे. एवढेच नव्हे, तर एक
महत्त्वाचा आनंद आहे; पण हा अनुभव निकोप रितीने घेतला,
घेता आला, तरच तो सुखद होतो. आनंददायक ठरतो व सुंदर
बनतो आणि म्हणूनच ह्या आनंदाच्या स्वरूपाची प्रथम ओळख
करून घ्यायला हवी.

कामपूर्तीकरिता दोन शरीरांच्या मिलनाची आवश्यकता
असते, हे तर खरेच; पण केवळ शरीरमिलनातून लैंगिक
समाधानाचा पूर्ण अनुभव मिळू शकत नाही. लैंगिक
समागमापासून खरा आनंद, खरे सुख लाभायचे असेल, तर
त्यासाठी परस्परांची समरसता, साद-प्रतिसाद आवश्यक आहे;
म्हणून ह्या विषयाच्या भावनिक बाजूची ओळख तरुण पिढीने
करून घेतली पाहिजे. तसेच लैंगिक सुखापासून मिळणारा आनंद
आणि इतर प्रकारचे आनंद, त्यातला फरकही जाणून घेतला
पाहिजे. लैंगिक आनंदाकरिता अतिशय समरसतेची जरुरी असते,
म्हणून तो एकांतात घ्यायचा असतो.

लैंगिक संबंध म्हणजे काहीतरी गुन्हा, काहीतरी लपूनछपून करण्याची
गोष्ट म्हणून नव्हे,तसेच हा आनंद अतिशय खाजगी स्वरूपाचा असल्यामुळे
त्याची चारचौघांत चर्चा करावयाची नाही, हा पण अर्थ लक्षात
न आल्यामुळे ह्या विषयाची एकंदरीतच चर्चा अत्यंत ग्राम्य व
असभ्य (Vulgar) पद्धतीने केलेली आढळून येते. स्त्री-पुरुष
संबंधांकडे एका विकृत दृष्टीनेच पाहण्यात येते. असे घडून
येण्यामागची कारणे थोडक्यात पाहिली पाहिजेत…

कामजीवनाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोनच आजपर्यंत
समाजात नव्हता. काही काही धर्मातून कामजीवनाकडे एक
पाप म्हणूनच पाहिले गेले. काही धर्माच्या दृष्टीने हे पाप नसले,
तरी ब्रह्मचर्याला अतिशय महत्त्व दिले गेले. ब्रह्मचर्य आदर्श मानले
गेले, जो ब्रह्मचारी राहू शकेल, तोच खरा श्रेष्ठ, अशीही एक
कल्पना होती. आता सामान्य माणसे ब्रह्मचर्य तर पाळू शकत
नाहीत, पण त्याच वेळेला एका बाजूने कामजीवनाचा अनुभव
घेणे हे वाईट आहे (निदान – गौण आहे) असेही मनावर ठसविले
जात असते. ह्यातून एक प्रकारची अपराधीपणाची भावना –
एक प्रकारचा मनोगंड – मनात निर्माण होतो. आजच्या पिढीला
“ब्रह्मचर्य हेच जीवन’ हा उपदेश कोणी करत नाहीत; पण
कुठेतरी हे संस्कार मनावर होत असतात व अंतर्मनात (Sub-
conscious mind) कुठेतरी खोलवर अपराधीपणाची भावना
निर्माण होत असते.

अर्थात बहुतेकांना कामजीवनात आनंद असतो, लैंगिक
अनुभव सुखकारक असतो, हे मान्य होते आणि म्हणूनच
कामतृप्तीची इच्छा धरणे चूक नाही, हेही मान्य होते. पण
अशांनीही कामजीवनाचा विचार केवळ पुरुषांच्या दृष्टिकोनातूनच
केला. लैंगिक सुख ह्याचा अर्थ पुरुषांनी स्त्रियांचा उपभोग घेणे
असाच घेतला गेला. वस्तुतः संभोग, समागम (Intercourse)
ह्या शब्दातच दोघांनी एकमेकांच्या सहवासातून घेण्याचा हा
आनंद आहे, हे स्पष्ट आहे. जीवनातील इतर आनंदांमध्ये व लैंगिक
आनंदामध्ये हाच महत्त्वाचा फरक आहे, तेव्हा ह्या प्रश्नाचा विचार
व्हायला पाहिजे.

परंतु लैंगिक आनंद हा केवळ पुरुषांनीच घेण्याचा आनंद आहे,
अशा रितीने त्याकडे आजपर्यंत तर बघितले गेलेच; अजूनही
बघितले जाते. स्त्रीने, विशेषतः चांगल्या घराण्यातील चांगल्या
स्त्रीने लैंगिक इच्छा बाळगणे, लैंगिक समाधानाची अपेक्षा धरणे हे
अयोग्य, अनुचित समजले जात होते व पुष्कळ ठिकाणी अजूनही
समजले जाते. स्त्रीने संभोगाला तयार व्हायचे, ते केवळ पतीची इच्छा
पुरवायला. पती-पत्नीच्या लैंगिक संबंधामध्ये पत्नीही सुखामध्ये भागीदार
असावी, हा विचारच नव्हता. पत्नी केवळ निष्क्रिय जोडीदार (Passive
partner) असावी, असे समजले जात असे.

काही वेळेला तर पत्नीच्या थंड प्रतिसादामुळे पुरेसे सुख मिळत
नाही ह्या सबबीवर पुरुष वेश्येकडे जात असत आणि त्याचे समर्थनही
केले गेले आणि पुष्कळ वेळेला अजूनही केले जाते.
ह्याच विचारातून स्त्री-पुरुषांच्या वर्तनाविषयी, वर्तनाच्या
नैतिकतेविषयी दुहेरी निकष (double standard) लावायची
प्रवृत्ती निर्माण झाली. आजही लग्नाच्या वेळी स्त्री ही कुमारिका
असावी (म्हणजे तिचा कौमार्यभंग झालेला नसावा. तिला
समागमाचा अनुभव नसावा.) असे मानले जाते. पुरुषांच्या
बाबतीत मात्र असा विचार करण्याचे कारण नाही, असे समजले
जाते. स्त्री-पुरुषांच्या बाबतीत असे भिन्न निकष लावण्याची पद्धत
निश्चितच अन्यायकारक आहे. त्याप्रमाणेच आजही संपत्तीच्या
किंवा अधिकाराच्या बळावर स्त्रीसहवास ही एक पुरुषार्थाने
मिरविण्याची गोष्ट मानली जाते.
समागम-सुखाची इच्छा असणे, हे स्वाभाविक आहे.

त्यात अपराध वाटण्यासारखे काही नाही, हे तरुणांनी समजावून
घेतले पाहिजे. काही तरुणींना ही जाणीव झाली आहे, ही एक
स्वागतार्ह गोष्ट आहे. तसेच समागमाच्या वेळी त्यांच्या मनाचा
आणि इच्छेचाही विचार केला जावा, अशीही एक रास्त अपेक्षा
त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. ह्या बदलत्या परिस्थितीचा
विचार आजच्या तरुणांनी करणे आवश्यक आहे. कदाचित काही
जणांच्या मनात असाही विचार येऊ शकेल की, नाही मिळालं
सुख आमच्या पत्नीला, न का मिळेना, आम्हांला सुख मिळालं
म्हणजे झालं; पण महत्त्वाची गोष्ट येथे लक्षात ठेवायला हवी,
आपल्या जोडीदाराकडून आपल्या भावनांना किती व कसा
प्रतिसाद मिळतो, ह्यावर समागमाचा आनंद बऱ्याच प्रमाणावर
अवलंबून असतो. तेव्हा आपल्या पत्नीच्या-सहचरीच्या
भावनांची दखल घेणे पुरुषांच्या स्वतःच्याही दृष्टीने आवश्यक
आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांनाही आपल्या भावना व अपेक्षा फाजील
संकोचाला बळी न पडता स्पष्ट केल्या पाहिजेत.

तर हे जे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, ते खऱ्या अर्थाने
सुखद आणि सुंदर केव्हा होऊ शकेल? हा आनंद सुसंस्कृतपणाने,
माणूसपणाला शोभेल, अशा रितीने घेता आला, तरच आपण
स्वतःला माणूस म्हणवून घेतो. तेव्हा कामजीवनाचा आनंद पाशवी
पातळीवर जाऊन घेणार की माणसाला शोभेल अशा पद्धतीने
घेणार, हा मुख्य प्रश्न आहे. साध्या साध्या गोष्टीतसुद्धा
सुसंस्कृतपणाने वागावे, अशी अपेक्षा असते. अधाशीपणाने
एखाद्याला जेवताना पाहिले, तरी बरे वाटत नाही. कोणी
बचावचा जेवला तर आपण लगेच म्हणतो, त्याला काही रीतभात
नाही.
काही ‘मॅनर्स’ नाहीत.

वागण्या-बोलण्यातसुद्धा
सुसंस्कृतपणा दिसावा, अशी रास्त अपेक्षा धरली जाते.
त्याचप्रमाणे लैंगिक सुख घेताना आपण सुसंस्कृतपणे वागतो
की ते सुख अधाशीपणाने, ओरबडल्यासारखे घेतो, फक्त
आपलेच सुख, आपलीच सोय पाहतो, ह्याचा विचार करायला
हवा. तसेच आपल्या वागण्याचे, आपण केलेल्या कृतीचे जे
परिणाम होतात, त्यांची जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत
का? की आयत्या वेळी आपण जबाबदारी टाळायला बघतो,
हेही तपासायला हवे.

ह्या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. ह्या
सर्व बाबींची चर्चा पाप-पुण्य ह्या भाषेत म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग वा
नरक मिळेल ह्या भाषेत करण्याचा विचार नाही; तर आपली
कृती, वर्तन सुसंस्कृतपणाचे आहे की असंस्कृतपणाचे आहे,
जबाबदारीचे, की बेजबाबदारीचे आहे, बळजबरीचे आहे की
परस्पर संमतीचे आहे ते ठरविण्याकरिता काही निकष शोधायचे
आहेत आणि त्या निकषांवर आपले वर्तन तपासून पाहायचे
आहे. कारण ह्यांच्या उत्तरावरच ते वर्तन चांगले आहे किंवा
नाही, नैतिक आहे की, अनैतिक आहे, मनुष्यपणाला शोभते
आहे की नाही, ते ठरत असते.

ह्याकरिता स्वतःचीच स्वतःवर काही बंधने घालून घेणे
आवश्यक असते. मूल आणि प्रौढ यांमधला हाच महत्त्वाचा फरक
आहे. मला ही गोष्ट आवडली आहे आणि ती मला तत्काळ,
लगेच मिळायला हवी, असे लहान मुलाला वाटत असते आणि
त्याच्या वयाला ते शोभतेही; पण वाढत्या वयाबरोबर अधिक
समजूतदारपणाने वागावे, अशी अपेक्षा असते. एखादी गोष्ट मला
आवडली, पण ती मागणे योग्य आहे का? मला ती मागावयाचा
अधिकार आहे का? याचा विचार तो करतो. मनात आले म्हणून
हट्ट केला, असे तो करत नाही; तर बऱ्या-वाईटाचा संपूर्ण विचार
करतो. असा विचार करणारी व्यक्तीच प्रगल्भ झाली, असे समजले
जाते,

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "लैंगिक संबंधांविषयी समज गैरसमज|sex education in marathi"

आपले मत कळवा