लैंगिक वर्तन कसे असावे?|ही 2 पथ्ये पाळा|sex education in marathi|

आपले लैगिंक वर्तन कसे असावे?
आपले लैंगिक वर्तन कसे असावे?

काश्मीर और काश्मिरी पंडित

(Marathi) Set of 6 Book 

लैंगिक सुख घेताना आपले लैंगिक वर्तन सुसंस्कृतपणाचे आहे की असंस्कृतपणाचे,जबाबदारीचे की बेजबाबदारीचे आहे बळजबरीचे आहे की परस्पर संमतीचे आहे. ते ठरवण्यासाठी काही निकष शोधायचे आणि त्या निकषांवर आपले वर्तन तपासून पहायचे.

कारण ह्यांच्या उत्तरावरच ते वर्तन चांगले आहे की नाही किंवा, नैतिक आहे की अनैतिक, मनुष्याला शोभते की नाही ते ठरते.

(१) जुलूम-जबरदस्ती (Compulsion) नको

आपली इच्छा सक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर लादणे हे अनैतिक
आणि माणुसकीला कलंक लावणारे आहे. सक्तीचा अर्थ
शारीरिक बलात्कार एवढाच होत नाही. अशा सक्तीच्या किंवा
बळजबरीच्या वेगवेगळ्या, खूपशा छटा असू शकतात. दुसऱ्या
व्यक्तीच्या मनाविरुद्ध आपली इच्छा त्या व्यक्तीवर लादणे म्हणजे
सक्ती. ह्याच्या एका टोकाला प्रत्यक्ष शारीरिक बलात्कार येईल,
तर दुसऱ्या टोकाला एखाद्या स्त्रीला अडचणीत टाकून संभोग
करायला भाग पाडणे येईल. स्वतःच्या अधिकाराचा, स्थानाचा
उपयोग करून हाताखालच्या स्त्रियांना संभोगाला भाग पाडणे,
दारिद्र्याने वा परिस्थितीने नडलेल्यांचा गैरफायदा घेणे ह्या सर्व
गोष्टींचा समावेश बळजबरीमध्येच होतो.

ही जबरदस्ती-बळजबरी, प्रसंगी विवाहित जोडप्यांमध्येही घडून
येऊ शकते. पती जर पुरेसा समजूतदार,पत्नीच्या इच्छेचा विचार
करणारा नसला व स्वतःच्या पत्नीवर लैंगिक समागम लादत असला,
लैंगिक सुख ओरबाडल्यासारखे घेत असला, तीही जबरदस्तीच होईल.
“Itis the response of the two partners that gives depth
to sexual experience” हे तरुणांनी लक्षात ठेवायला पाहिजे. ह्या
घटकाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वैवाहिक जीवन सुखी
होण्यामागे समरस कामजीवनाचा मोठा वाटा असतो; तेव्हा
सुखी वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनेसुद्धा हा विचार करणे
महत्त्वाचे ठरते.

(२) फसवणूक (Deception) नको

दुसऱ्या व्यक्तीला फसवून, भुलवून, खोटी आश्वासने
देऊन समागमाला, संभोगाला प्रवृत्त करणे हा अयोग्य,
बेजबाबदार वर्तनाचा आणखी एक प्रकार. ह्याची सुरुवात होते,
“तुझे माझ्यावर प्रेम असेल, तर तू माझ्याशी समागमाला तयार
हो,” असे मैत्रिणीला किंवा प्रेयसीला सांगण्यापासून आणि तेही
आपल्या मनात प्रेम नसताना. काही वेळेला तर मैत्रिणीला
राजी करण्यासाठी लग्नाचे खोटे आश्वासनही दिले जाते. “अगं,
आपण लग्न करणार आहोत ना? होऊन होऊन काय होणार
आहे ? लग्नानंतर केले काय आणि लग्नाअगोदर केले काय?”
पण काही घोटाळा झाला, तर मात्र जबाबदारी घ्यायची तयारी
नसते. ही चक्क फसवणूक आणि म्हणून अनैतिक आहे, ह्या
आश्वासनांच्या जाळ्यात भोळ्या मुली सापडतात आणि
फसतात.

आपले प्रेम सिद्ध करण्याकरिता म्हणून अशा प्रकारे लैंगिक
संबंधाला तयार होण्याऐवजी, “तुझे माझ्यावर प्रेम असेल, तर
तूच थोडा धीर धर,” असे आपल्या मित्राला/आपल्या
प्रियकराला सांगण्याची तरुणींच्या मनाची तयारी असायला
पाहिजे.

इथेच आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो.
“ज्या अर्थी मी म्हटल्याबरोबर ही मुलगी समागमाला तयार
झाली, त्या अर्थी ती चारित्र्याने चांगली नाही,” असा अर्थ
लावला जातो. “हिच्यात स्वाभिमान नाही, नाही म्हणण्याचे
धैर्य नाही’ अशी तुच्छताच तिच्या वाट्याला येते; पण आपण
अशा प्रकारची मागणी करण्यात आपले काही चुकते आहे, याची
जाणीव मात्र ह्या लोकांना नसते. अशा प्रकाराने फसवून दुसऱ्या
व्यक्तीला समागमाला तयार करणे हे कृत्य बेजबाबदारपणाच्या
जोडीला अनैतिकही आहे.

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

1 Comment on "लैंगिक वर्तन कसे असावे?|ही 2 पथ्ये पाळा|sex education in marathi|"

आपले मत कळवा