ललित साहित्य म्हणजे काय ?| Marathi sahitya/literature means?

साहित्य। marathi sahitya
ललित साहित्य म्हणजे काय? साहित्य म्हणजे काय?याविषयीची विविध प्रकारची माहिती थोडक्यात समजून घेऊ .!Best Words in the best Words अशी साहित्याची व्याख्या केली जाते.
संस्कृत काव्यमीमांसकांनी ‘रीति : आत्मा काव्यस्य’ अशी साहित्याची
व्याख्या केली आहे. ‘रीती हा साहित्याचा आत्मा असतो, ती
साहित्याचे मुख्य लक्षण असते. ‘रीती’चीही व्याख्या संस्कृत
काव्यमीमांसक वामनान याने केली. ती अशी- ‘विशिष्ट पदरचना
रीती: (विशिष्ट पद्धतीने केलेली शब्दरचना म्हणजे ‘रीती’) शब्दक्रम,
शब्दनिवड, विशेष अर्थ प्रतिपादन करणारे शब्द या सर्वांचा रीतीशी
संबंध असतो.

ललित साहित्य म्हणजे काय?

‘ललित’ या शब्दाचा अर्थ सौंदर्य असा आहे. मनाला
आकर्षून घेणार, मनाला आनंद देणारे सौंदर्यत्व या शब्दामधून
सूचित होते. सुंदर सुंदर कल्पना भाषेद्वार प्रकट करण्याची लेखकाची शक्ती ही
कलानिर्मितीची शक्ती म्हणावी लागेल, औचित्यपूर्ण भाषेतून
जीवनातील अनेक अनुभवांचे संश्लेषण तो प्रकट करीत असतो
प्रत्यक्षातील माणसं, त्यांचे स्वभावविशेष, त्यांचे गुण-अवगुण,
त्यांच्या जगण्यावागण्याच्या पद्धती. आपले सांस्कृतिक संचित
याविषयीचे लेखकाचे आकलन आणि जीवनाकडे पाहण्याची त्यांची
दृष्टी या सर्वांचे परीदर्शन ललित लेखनातून होत असते.व्यवहारातील अनुभवाना ललित साहित्यातील कलात्मक
अनुभवापर्यंत पोहचविण्याचे रचनात्मक कार्य लेखक करीत असतो.
लेखकाने प्रत्यक्षात पाहिलेला माणुस बन्याच्या कथा-कादंबरी
किंवा नाटकातला माणुम यांच्यात आपण फरक करतो.
लेखक प्रत्यक्षात या माणसावरून, अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने
नवा माणूस निर्माण करतो त्याला आपण ‘पात्र’ म्हणतो. ती निर्मिती
प्रतिभासिक निर्मिती असते. प्रत्यक्षातल्या जीवनाचे
कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे
साहित्यनिर्मिती.’साहित्य’ या शब्दाचा सहित-तत्त्वाशी निगडित आहे.’शब्द’ व ‘अर्थ’ यांच्यातील सहित-तत्व म्हणजे ‘साहित्य’ अशी
एक व्याख्या केली जाते. शब्द व अर्थ यांची औचित्यपूर्ण व
सौंदर्यपूर्ण सांगड घालणे म्हणजे हे ‘सहित-तत्व’ . नवा
सौंदर्यपूर्ण अर्थ निर्माण करण्यासाठी योग्य अशा शब्दांची निवड
करणे, भाषेचा सौंदर्यपूर्ण वापर करणे महत्वाचे असते. लेखक
शब्दांची व वाक्यांची व्यवहारभाषेपेक्षा सौंदर्यपूर्ण अशी नवी जुळणी
करतो, अनुभव घटकांमध्ये नवे सौंदर्यपूर्ण संबंध प्रस्थापित करतो
तेव्हा त्या रचनेतून साहित्य जन्माला येते.

(१) रसात्मक अनुभव म्हणजे साहित्य

लेखकाने निर्मिलेल्या साहित्याच्या वाचनातून रसनिष्पत्ती
होते असे आपण म्हणतो. ‘वाक्यम रसात्मकं काव्यम्’ अशी
• साहित्याची एक व्याख्याही केली गेली आहे. साहित्य हे रसपूर्ण
असते असा हा व्याख्येचा सरळ अर्थ आहे. अर्थात अनेक
वाक्यांच्या संयोजनातून अशी सिनिष्पती होत असते. वाचकाला
सुखद अनुभूती देणारे साहित्य रसयुक्त असते. म्हणजेच शृंगाररस.
हास्यरस, करुणरस असे रस निमाण करणारी शब्दसहिता ही साहित्य
ठरते असा हा विचार आहे.

(२) आलंकारिक शब्दरचना म्हणजे साहित्य

‘आलंकारिक शब्दरचनेला साहित्य म्हणतात’ अशीही एक
साहित्याची व्याख्या केली जाते. रमणीय अर्थ प्रतिपादन करणारे
शब्द म्हणजे अलंकार. अलंकार हे बाह्यरूप सजवतात तसेच
अर्थालाही सुशोभित करतात. अर्थात, बाह्य सजावटीपेक्षा
शब्दार्थाच्या आंतरिक सजावटीला साहित्यात महत्व असते. केवळ
अलंकारिक भाषेत वर्णन आहे म्हणून ते साहित्य असे।म्हणता येणार नाही.
आपण देह सजवण्यासाठी अलंकार परिधान करतो तसे साहित्यात अलंकार
केवळ शोभामात्र असू नयेत. जिवणार्थसंबंधीची नवी जाणीव निर्माण करणारे
अलंकार साहित्यात अभिप्रेत असतात.’साहित्य’ ही संज्ञा आपण कथा, कादंबरी, नाटक, कविता,
आत्मकथा, ललित निबंध अशा साहित्य प्रकारांसाठी वापरतो.
लेखकाची सर्जनशील भाषिककृती ही साहित्यकृती ठरते.
कल्पनाशीलता, सूचकता. विशिष्ट जीवनानुभवाची उत्कटनिर्मिती,
विशिष्ट जीवनदृष्टी, सौंदर्य निर्माण करणारी प्रतिभाशक्ती या सर्वाची
संमिलित कलात्मक निर्मिती ही ‘साहित्य’ या संज्ञेस पात्र ठरते.
सर्जनशील भाषेतील लिखितकृती ही साहित्यकृती होय
.
डॉ.वा.के.लेले साहित्यकृतीचे वर्णन पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात –         “साहित्य ह्या संज्ञेत शब्द व अर्थ ह्यांचा सहभाव अनुस्यूत
आहे. अनेक शब्दसंहिती, वाक्ये व परिच्छेद ह्यांच्या योगाने एखादी
लेखनकृती सिद्ध होत असते. ती एका विशिष्ट व्यक्तीने किंवा अनेक
व्यक्तींनी एकत्र येऊन सामूहिक रीतीने सिद्ध केलेली असते.
डोळ्यांनी वाचून समजून घ्यावयाची ही भाषानिबद्ध कृती
मनुष्यस्वभाव व मनुष्यजीवन याविषयीचे वाचकाचे कुतूहल चाळवते
व यथासामर्थ्य शमविते. लेखकाने आपली आत्यंतिक
व्यक्तिनिष्ठ व म्हणून मौलिक अशी अनुभूती पराकाष्ठेच्या सचोटीने
व मनःपूर्वकतेने प्रकट केलेली असते. तसे करताना तो गब्दबंध,
वाक्यविन्यास, परिच्छेदांची गुंफण व इतर घटकांची संरचना,
लेखनकृतीच्या परिणामाला अनुरूप अशा तंत्राची निवड करून
साधत असतो.           ह्या कामी त्याला त्याचे मानवी जीवनाचे निरीक्षण,
त्याने प्रयत्नपूर्वक संपादन केलेली लेखनकुशलता, त्याची बहुश्रुतता
व सौंदर्याभिरुची ह्यांचे परोपरीने साह्य होत असते. अशा प्रकारे सिद्ध
झालेली भाषिककृती कधी पद्यरूप असते, तर कधी गद्यरूप असते.
ह्यापैकी कोणतेही एक रूप पत्करताना लेखकाला त्या त्या रूपाशी
निगडित असलेले व युगीय परंपरेने मान्य केलेले लेखन-संकेत
(Conventions of writing) साक्षेपाने पाळावे लागतात. अशी
लेखनकृती वाचकांच्या हाती पडते. ते ती वाचतात व ती सर्व दृष्टीनी
‘सुघटित’ असल्यास तिच्या वाचनापासून, अलौकिक, उत्कट ब
निर्भेळ कलानंदाचा अनुभव घेतात. असा कलानंद देणारी लेखनकृती
ललित साहित्यकृती ठरते.”भाषेच्या सौंदर्यपूर्ण उपयोजनातून विविध अनुभवांचे,
जीवनाशयाचे उत्कट दर्शन साहित्यातून घडते. जीवनाचा शोध व
आत्मशोधाच्या प्रेरणेतून सर्जकभाषेद्वारा साधलेली शब्दार्थात्मक
कृती ही ‘ललित साहित्य’ असते.ललित साहित्याचे प्रकार किती व कोणकोणते ते बघूया पुढच्या भागात.

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "ललित साहित्य म्हणजे काय ?| Marathi sahitya/literature means?"

आपले मत कळवा