राग म्हणजे काय? व्याख्या व वर्गीकरण|raga information in marathi

राग म्हणजे काय?
राग संकल्पना व स्पष्टीकरण

राग-व्याख्या आणि वर्गीकरण

शास्त्रीय संगीत हे अन्य संगीत प्रकारांपेक्षा
अधिक अमूर्त (Abstract) आहे. ही अमूर्तता कशामुळे येते असा
विचार करता आपल्याला लक्षात घ्यावे लागते की मुळात आपल्या
शास्त्रीय संगीताच्या गाभ्याची असलेली ‘राग’ संकल्पना हीच अत्यंत
अमूर्त अशी कल्पना आहे. या संकल्पनेचा आता आपण परिचय
करून घेऊया.

असे म्हटले जाते की, आपले संगीत हे राग संगीत आहे. या
संगीतात वेगवेगळे राग गायचे अथवा वाजवायचे असतात. हा राग
येतो कोठून?

(१) रागाची व्याख्या

रागाची आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये केलेली व्याख्या-

रंजयते इति रागः’ जो रंजन करतो (असा स्वरसमूह) तो राग अशी आहे.
हा राग रंजन करतो ते कोणाचे? तर त्याचे स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात
मिळते.

यो यं ध्वनिविशेषस्तू स्वर वर्ण विभूषित : ।।
रंजको जनचित्रानाम् स राग: कथितो बुधैः ।।

या श्लोकाचा थोडक्यात अर्थ – असा ध्वनिविशेष
जो स्वर वर्णानी विभूषित आहे आणि जनचित्ताचे रंजन करतो त्याला
बुद्धिमान लोक ‘राग’ असे म्हणतात.

(अ) स्वरसंच/स्वरसमूह

वरील विवेचनातून एक गोष्ट स्पष्ट होते की, राग हा मुळात
एक स्वरसमूह / स्वरसंच आहे. आपण स्वर आणि सप्तक ह्या
संकल्पना बघितल्या आहेत. आता आपल्याकडे असलेले सगळे
१२स्वर रागात एकदम न वापरता त्यापैकी काही स्वर निवडून रागाचा
स्वरसंच बनतो.

आपण एक उदाहरण घेऊया. आपल्या शाळा, कॉलेजमध्ये
संचलनगीत, स्वागतगीत, इत्यादीकरिता एक राग नेहमी वापरला
जातो तो म्हणजे राग भूप. या रागाचे स्वर पुढीलप्रमाणे आहेत

सा रे ग प ध सां
सां ध प ग रे सा

(२)स्वर निवडीचे नियम (‘सा’ हा स्वर

अत्यावश्यक)

रागाच्या स्वरसंचामध्ये स्वर निवडताना सगळ्यात पहिला
नियम पाळला जातो तो म्हणजे प्रत्येक रागात ‘सा’ हा स्वर
अत्यावश्यक आहे. याचे कारण उघड आहे. ‘सां’ हा आपला
आधारस्वर. त्याच्याशिवाय अन्य स्वराना अस्तित्वच लागत नाही
त्यामुळे राग भूपमध्येही ‘सा’ आहेच.

(अ) ‘च’ किंवा ‘म’ स्वर असतोच

रागाच्या स्वर निवडीचा दुसरा नियम म्हणजे रागात ‘प’ किंवा
‘म’ यापैकी एक स्वर घेतला जातोच. ‘प’ आणि ‘म’ हे दोन्ही स्वर
रागात नाहीत असा रागच नाही. त्यामुळे राग भूपमध्ये ‘प’ हा स्वर
आहे. सप्तकातल्या प्रमाणबद्ध सारखेपणाचे (Symmetry) दर्शन’म’
आणि ‘प’ या सांध्याभोवती आपल्याला होते. त्यामुळे ‘म’किंवा
”हा स्वर रागात असल्याने त्याभोवती सुंदर स्वररचना करणे गायक
बादकाला शक्य होते.

(आ) तीन स्वर असावेत

त्याच्या पुढच्या टप्प्यावर रागाबद्दलचा आणखी एक नियम
दिसतो तो म्हणजे आणखी किमान तीन स्वर रागात असावेत. ‘सा’,
‘म’ किंवा ‘प’ आणि आणखी किमान तीन स्वर म्हणजे साधारणपणे
पाच स्वरांचा राग बनतो. शास्त्रीय संगीतात काही अत्यंत
अपवादात्मक असे चार स्वरांचे राग आहेत; पण त्यातही मांडणी
करताना पाचवा स्वर घेतला जातो. आपल्या उदाहरणातला राग भूप
पहिला तर त्यात ‘सा’, ‘प’ या व्यतिरिक्त ‘रे’ ‘ग’ आणि ‘ध’ हे
स्वर घेतलेले दिसतात

(इ) पूर्वांग आणि उत्तरांगांचा समतोल

जे स्वर रागात निवडले त्याच्या निवडीचा सौंदर्यात्मक असा
एक निकष मानला जातो तो म्हणजे पूर्वांग आणि उत्तरांग यांचा
समतोल. राग ‘भूपचे’ उदाहरणच घ्यायचे झाले तर सा, रे, ग, प,
ध, सां या स्वरांमध्ये पूर्वांगातले सा,रे, ग आणि उत्तरांगातील प, ध,
सां असे स्वर दिसतात आणि त्यामुळे पूर्वांग आणि उत्तरांग यांच्यातला
सुरेख असा समतोल दिसतो.

(३) रागाचे चलन

रागाकरता निवडायच्या स्वरांची निश्चिती झाल्यानंतर राग
पूर्ण होतो का? तर नाही. आपल्या संगीतात रागाचे स्वर निवडल्यानंतर
त्या स्वरांना कशा प्रकारे म्हणायचे याची एक शिस्त, एक पद्धत प्रत्येक
रागाकरता निश्चित केलेली आहे. यालाच रागाचे ‘चलन’ असे म्हणतात.

‘चलन’ या शब्दाचा अर्थ चालणे या शब्दाशी संबंधित आहे.
रागातले स्वर कसे म्हणायचे आणि कोणत्या क्रमाने म्हणायचे
याबद्दलचे नेमके नियम, संकेत, परंपरा चलनाद्वारे सांभाळल्या जातात.
आपण भूप रागाचे एक उदाहरण बघुया.

आकृती

(४) भूपचे चलन

वरील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे भूपचे स्वर सा, रे, ग,
प, घ,सां हे म्हणण्याची एक पद्धत सांभाळायची असते. आरोहामध्ये
‘सा’ वरून ‘रे’ वर जाताना ‘ग’ ला स्पर्श करून यायचे,’रे’ वरून
‘ग’ वर जाताना ‘प’ ला स्पर्श करून जायचे. असे गोलाकार स्वर
म्हणणे हेच भूपचे चलन. चलनामुळे रागाला स्वत:चे व्यक्तिमत्त्व
प्राप्त होते. भूपच्या चलनाचा आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे भूपचे
स्वर अतिशय संथ लयीत, सावकाश म्हणायचे असतात. भूप म्हणजे
राजा, त्यामुळे राजाची ऐट आणि डौल सांभाळत भूप गायला जातो.

आता प्रश्न असा येईल की, स्वरसंच तोच ठेवून चलन
बदलला तर राग बदलेल का? सा, रे, ग, प, ध, सां या स्वरांचे
चलन बदलले तर वेगळा राग तयार होतो का? होय. असा त्याच
स्वरांपासून वेगळ्या चलनाद्वारे तयार होणाऱ्या रागाला ‘देशकार’ असे
म्हणतात.

देशकारच्या चलनाची गंमत अशी की, तिथे भूपाची संथ
चाल नाही. स्वर जलदगतीने म्हटले जातात. ‘सा’ वरून ‘रे’ वर
सरळ जायचे, गोलाकार स्वर म्हणायचे नाहीत. ‘सा’ पासून ‘ध’
पर्यंत उडी घ्यायची असे सगळे चलनाचे नियम देशकारकरिता निश्चित
केलेले आहेत.

स्वरसंच निवडून तो विशिष्ट पद्धतीने, नियमांना
धरून, म्हणजेच विशिष्ट चलनाप्रमाणे म्हटल्यावर ‘राग’ अस्तित्वात येतो

(५) वादी आणि संवादी स्वर

रागाच्या निर्मिती प्रक्रियेला पूर्णत्व देणारे सौंदर्यतत्त्व म्हणजे
रागाचे वादी आणि संवादी. वादी स्वर म्हणजे रागातला मुख्य स्वर
आणि संवादी म्हणजे रागातला उपमुख्य स्वर.

वादी राजा स्वरस्तत्र संवादी संवादी अमात्यवत् ।

वादी स्वर राजाप्रमाणे असून संवादी प्रधानाप्रमाणे रागात
असतो. गाताना किंवा वाजवताना ज्या स्वराला सगळ्यात जास्त
महत्त्व दिले जाते तो वादी स्वर आणि त्या स्वरापेक्षा कमी महत्त्व मात्र
रागातल्या अन्य स्वरांपेक्षा अधिक महत्त्व असलेला स्वर संवादी स्वर
होय. आता भूप रागात ‘ग’ गंधार हा वादी स्वर आहे तर ‘ध’ धैवत
हा संवादी. वादी स्वर पूर्वांगात असेल तर संवादी उत्तरांगात असतो,
असा सर्वसाधारण नियम आहे.

एका स्वरसंचापासून रागाला व्यक्तिमत्त्व देण्याची ही प्रक्रिया
थोडक्यात आकृती बघा

-वादी आणि संवादी स्वर

रागाच्या निर्मितीप्रक्रियेशी निगडित सर्व नियम आपण समजून
घेतले. असे नियम वापरून, आपल्या सप्तकातल्या १२ स्वरांच्या
मधून वेगवेगळे स्वरसंच तयार केले तर त्यांची संख्या किती होईल?
प्रश्न वेगळ्या शब्दात विचारायचा तर सगळे नियम वापरून एकूण
राग किती तयार करता येतील? गणित मांडले तर तो आकडा
साधारणपणे ३४,८४८ एवढा आहे. प्रत्यक्षात आज गायले-वाजवले
जाणारे, प्रचारातले राग साधारणपणे २५० ते ३०० एवढेच आहेत.
आता ३४,८४८ राग शक्य असताना प्रत्यक्षात एवढे कमी राग गायले.
वाजवले जातात असे का?

याचा विचार करता या संकल्पनेची निर्णायक कसोटी
‘रंजकतेची’ आहे हे आपल्याला लक्षात येते. ज्या स्वरसंचात
जनचित्ताचे रंजन करण्याची क्षमता आहे त्यालात बुद्धिमान लोक
राग म्हणतात. इथे रंजन म्हणजे निव्वळ करमणूक नव्हे, मानसिक
आणि बौद्धिक पातळीवर अतीव आनंद निर्माण करण्याची क्षमता या
अर्थाने रंजन हा शब्द वापरला जातो हे महत्त्वाचे.

(६)वर्गीकरण

नियमित गायले, वाजवले जाणारे राग २५०-३०० आहेत.
असे जरी असले तरीही ही संख्या अभ्यासकांसाठीसुद्धा मोठी आहे.
त्यामुळे वर्गीकरणाची काही पद्धती असावी असा विचार
संगीताच्या क्षेत्रात सुरू झाला.

(अ) मेल पद्धत

वर्गीकरणाची एक शास्त्रीय आणि गणिती पद्धत दक्षिणी
संगीतकार व्यंकटमुखी यांनी आपल्या चतुर्दण्डी प्रकाशिका या ग्रंथात
सांगितली आहे. त्याला ‘मेल-पद्धती’ असे म्हणतात. त्यात एकूण
७२ जनक मेल सांगितले आहेत. त्यातून सर्व ‘राग’ निर्माण झाले असे
व्यंकटमुखींचे प्रतिपादन आहे.

(आ) थाट पद्धत

२० व्या शतकात याहूनही सोपी आणि सुटसुटीत रचना
पं.विष्णुनारायण भातखंडे यांनी आणली. त्या पद्धतीला थाट पद्धत’
असे म्हणतात. भातखंड्यांनी एकूण दहा थाट सांगितले. प्रचारात
असलेले बहुसंख्य ‘राग’ या दहा थाटांमध्ये आपल्याला बसवता येतात.
या पद्धतीचा वापर आजही मोठ्या प्रमाणावर केला जातो. संगीत
अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही क्षेत्रात थाट पद्धती प्रचारात आहे.
पं. भातखंडे यांनी सांगितलेले दहा थाट पुढीलप्रमाणे –

रागांवर आधारित मराठी संगीत ऐकाhttps://www.swarganga.org/marathisongs.php

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "राग म्हणजे काय? व्याख्या व वर्गीकरण|raga information in marathi"

आपले मत कळवा