मुक्त लैंगिक संबंध म्हणजे काय? या संबंधांतून निर्माण होणाऱ्या समस्या|

मुक्त लैंगिक संबंध म्हणजे काय?
मुक्त लैंगिक संबंधांमधून निर्माण होणाऱ्या समस्या

मुक्त लैंगिक संबंध – आधुनिक युगात एक नवीन विचार प्रस्थापित होऊ पाहात

आहे आणि पश्चिमेकडून आल्यामुळे आपल्याकडेही तो मान्य
होण्याचा संभव आहे. हा विचार आहे मुक्त लैंगिक संबंध.

मुक्त लैंगिक संबंध मान्य असलेल्यांच्या म्हणण्याप्रमाणे लैंगिक
संबंधांबाबत विशेष बाऊ करण्याचे कारण आहे का ? ह्या
संबंधांमध्ये सक्ती, बळजबरी आणि फसवणूक नको. एवढ्या
दोन गोष्टी पाळल्यानंतर इतर बंधनांची काही आवश्यकता आहे
का?

परस्परांवर खरे प्रेम असले, तर विवाहपूर्व आणि
विवाहबाह्य लैंगिक संबंधांना काय हरकत आहे ? डोक्यावर
केवळ अक्षता पडल्यानेच प्रेमाला व लैंगिक व्यवहाराला पावित्र्य
येते का? असा प्रश्न विचारला जातो. काही जण ह्याच्याही पुढे
जाऊन एक विचार पुढे मांडतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन
व्यक्ती एकत्र आल्या, आपले एकमेकांवर प्रेम नाही, हे त्यांनी
सुरुवातीलाच स्पष्ट केले, एकमेकांना कसली खोटी आश्वासने
दिली नाहीत आणि राजीखुशीने त्यांनी समागमाचा निर्णय घेतला
आणि आपल्याच इच्छेने परस्परांपासून दूर झाले, तर मग त्यात
बिघडले काय ? कोणीच कोणावर अन्याय केला नाही.

बळजबरी केली नाही, फसवाफसवी केली नाही, सगळा
खुल्लमखुल्ला मामला; तर मग बिघडले कुठे ? राजीखुशीचा,
परस्पर-संमतीचा व्यवहार असल्यावर मग नैतिकतेचा व
अनैतिकचा प्रश्नच कुठे येतो? केवळ पुरुषच हा विचार मांडतात
असे नाही, आधुनिक काळात स्त्रीयाही हा विचार मांडू शकतील.

असा प्रश्न विचारणारे लोक, मुक्त लैंगिक व्यवहाराच्या
परिणामांबाबत, त्यांतील धोक्यांबाबत एक तर विचार तरी करत
नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी करीत असतात. अशा लैंगिक
व्यवहाराचे अनेक अनिष्ट परिणाम संभवतात. म्हणून त्याविषयी
अधिक खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे. “केवळ
अक्षता पडल्यानेच प्रेमाला व लैंगिक संबंधांना पवित्रपणा येतो
का?’ असे विचारणारांनी पुढील बाबींचा विचार करणे
आवश्यक आहे. समाजमान्यता नसल्याने विवाहपूर्व व विवाहबाहा
संबंध हे चोरून, लपून छपून ठेवावे लागतात. विवाहबाह्य
संबंधांमध्ये तर वैवाहिक जीवनात कलहाला तरी प्रारंभ होतो.

साहजिकच ह्या सर्व गोष्टींचा भावनिक व मानसिक ताण येतो
तसेच अशा संबंधांतून नको असलेले विपरीत परिणाम – विशेषतः
गर्भधारणा घडून आली, तर सामोरे जाण्याचे, परिणामांची
जबाबदारी स्वीकारण्याइतके मानसिक धैर्य क्वचितच आढळते.
परिस्थितीचा सामना धीटपणे आणि उघडपणे करण्याऐवजी
तिथून पळून जाण्याचा विश्वामित्री पवित्रा घेतला जाण्याची
शक्यताच अधिक.

मा लपून छपून संबंध ठेवावे लागत असल्याने मानसिक व
भावनिक ताण तर येतातच. त्याच्या जोडीला एकमेकांवरचा
विश्वास ढळतो. मत्सराची भावना तर असतेच. साहजिकच
एकमेकांविषयी निष्ठा टिकून राहणे कठीण होते. अशा
परिस्थितीत स्वैराचार (Promiscuity) वाढण्याचा संभव
असतो.

पाश्चिमात्य राष्ट्रांचा अनुभव पाहिल्यास असे दिसून येते
की अशा नात्यातून निर्माण झालेल्या स्वैराचारामुळे अवांच्छित
गर्भधारणा व अवांच्छित संततीचे प्रमाण वाढते आहे. जबाबदारी
पेलता न येण्याच्या वयात मातृत्वाची जबाबदारी अंगावर पडते,
अशी किती तरी उदाहरणे आढळून येतात. त्याचा परिणाम
अडचणीत आलेल्या या तरुणींच्या जीवनावर तर होतोच; पण
नको असताना जन्माला आलेल्या बालकाचे भावनिक विश्व
उद्ध्वस्त होण्याचाही धोका असतो. गर्भपात करून घेतला, तरी
त्यातूनही काही मानसिक ताण व समस्या निर्माण होतात.

विवाहबाह्य लैंगिक व्यवहारामुळे वैवाहिक जीवनावरही अनिष्ट
परिणाम होतात. विवाह एकतर मोडला तरी जातो किंवावैवाहिक
जीवनावर असह्य ताण पडतो. ह्याचे परिणाम संबंधित पती-
पत्नींना तर भोगावे लागतातच; पण त्यात प्रामुख्याने बळी जात
असतात, ती ज्यांचा स्वतःचा काहीच दोष नाही, अशी निष्पाप
बालके (संतती), माता-पित्यांमधील बिनसलेल्या नात्याचा ह्या
मुलांवर तात्कालिक परिणाम तर होतच असतात; पण त्यांच्या
भावी जीवनावरही त्याचे विपरीत संस्कार घडत असतात.

तिसरे म्हणजे वैद्यकीय ज्ञानात नित्य नवनवे शोध लागत
‘असूनही स्वैराचारामुळे गुप्तरोगांचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या
मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. एका व्यक्तीचा किती जणांशी
संबंध यावा, याला काही धरबंध राहिला नसल्यामुळे ह्या रोगाला
आळा घालणे कठीण होऊन बसले आहे.

हे झाले प्रेमापोटी असलेल्या विवाहपूर्व व विवाहबाह्य
संबंधातील परिणामांबाबत. केवळ शारीरिक पातळीवरील
सुखाकरिता दोन व्यक्ती एकत्र येतात. तेव्हा हे धोके अधिकच
तीव्रव घातक बनतात. तरुणांनी त्याची दखल घेणे, त्यासंबंधाने
विचार करणे आवश्यक आहे.

आपण केवळ शारीरिक समाधानाकरिता एकत्र येत
आहोत, असे परस्परांना सुरुवातीलाच मोकळेपणाने आणि
उघडपणे सांगितलेले असते, तरीही काही दिवसांनी त्यांपैकी
एक कधी स्त्री, कधी पुरुष – दुसऱ्यात मनाने गुंतत जातात. ज्या
वेळी परस्परांपासून दूर जाण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा
आपल्यावर अन्याय झाला आहे, आपण फसविले गेलो आहोत,
अशी भावना साहजिकच त्या व्यक्तीच्या मनात उत्पन्न होते.
एकमेकांशी बांधून घेतले नसले, तरीही मनातील मत्सराची भावना
पूर्णपणे गेलेली नसते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ शारीरिक पातळीवरून
घेतलेला समागमाचा आनंद खरे मानसिक समाधान देऊ शकत
नाही. Intimacy leading to inter-course असे असले
तरच समागमाचा खरा आनंद, खरे समाधान मिळू शकते. अशा
वागण्याचे विपरीत परिणाम व्यक्तीच्या भावी जीवनावरही होत
असतात. तेही समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा
प्रकारे वागणाऱ्याच्या मनात स्वतःबद्दलच एक कमीपणाची काही
वेळेला तर तिरस्काराची भावनाही निर्माण होते. स्वतःबद्दलचा
आदर राहत नाही. नकार देण्याचे, नाही म्हणण्याचे धैर्य स्वतःत
आहे, ही भावनाच माणसाला फार मोठ्या प्रमाणावर
आत्मविश्वास देत असते. हा आत्मविश्वासच अशा व्यक्ती गमावून
बसतात.

पुरुषाला आकर्षित करून घेण्याजोगे दुसरे काहीच गुण
अंगी नाहीत, म्हणून अशी स्त्री आपल्या शरीराचा उपयोग करते,
संभोगाच्या मागणीला होकार देते, असा अर्थ लावला जातो.
एवढेच नव्हे, तर त्या स्त्रीची स्वतःचीही तशीच भावना होते.
आपल्या वागण्याने आपणच आपली किंमत कमी करून घेतली
आहे, असे वाटायला लागते. परिणामी स्वतःच्याच नजरेतून ती
उतरते. ह्याचा परिणाम म्हणून नैराश्याची, वैफल्याची भावना
तिला घेरून टाकते. ह्याचा परिणाम तिच्यात काम-उदासीनता
(फिजिडिटी) निर्माण होण्यात होऊ शकतो किंवा ती स्त्री नंतरच्या
आयुष्यात भरकटत तरी जाते.

पुरुषांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या लैंगिक वर्तनामुळे
निरनिराळ्या प्रकारच्या कामसमस्या (Sexual inade-
quacies) निर्माण होऊ शकतात, असे आढळून आले आहे.
ह्या सर्वांचे प्रतिबिंब, पडसाद स्त्री-पुरुषांच्या एकूणच
भावी आयुष्यावर विशेषतः त्यांच्या वैवाहिक जीवनावर उमटणे
अपरिहार्य असते. साहजिकच त्याचा त्यांच्या कुटुंबातील इतर
व्यक्तींच्या सुखावरही विपरीत परिणाम होतो. हे विपरीत परिणाम
केवळ वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित न राहता त्याचे पडसाद
सामाजिक जीवनावरही उमटतात, ह्याचीही जाणीव प्रत्येक
व्यक्तीला हवी. भावनिक अस्थैर्यामुळे (Feeling of
emotional in-security) समाजामध्ये – विशेषतः लहान
मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळावते व त्याचा परिणाम सर्वांनाच
भोगावा लागतो.

प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे कामेच्छा आणि कामपूर्तीची
इच्छा ही स्वाभाविक आहे. नैसर्गिक आहे. कामजीवन सुखद
आणि आनंददायक होण्याकरिता निकोप दृष्टीची आणि
जबाबदारीच्या जाणिवेची आवश्यकता आहे. नव्याने उत्पन्न
होणाऱ्या लैंगिक ऊर्मीबद्दलच्या अर्धवट ज्ञानामुळे, तसेच
त्या विषयीच्या योग्य दृष्टीची व जबाबदारीची ओळख झालेली
नसल्यामुळे आणि परिणामांची जाण नसल्यामुळे तरुण
मंडळींच्या हातून अनेकदा चुका घडून येतात. हे लक्षात येऊन

आता याविषयीचे शास्त्रीय ज्ञान देणारी पुस्तके उपलब्ध होत
आहेत. तसेच मोठ्या शहरांतून तरी मार्गदर्शन केंद्र स्थापन
करण्यात आलेली आहेत. तरुणांनी ह्याचा लाभ करून घेतला
पाहिजे.

https://www.socialmahi.in/लैंगिक-वर्तन/

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "मुक्त लैंगिक संबंध म्हणजे काय? या संबंधांतून निर्माण होणाऱ्या समस्या|"

आपले मत कळवा