माणसाला वृद्धत्व का येते ?|म्हातारपणाची 6 लक्षणे|old age |

शैक्षणिक
फोटो-गुगल मामु

माणसाला म्हातारपण /वृद्धत्व का येते यासंबंधी सध्या उपलब्ध
असलेली काही ठळक कारणे अशी सांगता येतील.

(१) शरीर – एक यंत्र

शरीराला एक प्रकारचे यंत्र समजून, याच्या सतत वापराने
झीज होऊन वार्धक्याची चिन्हे उद्भवतात, असा फार जुना
समज आहे. या चिन्हांमध्ये वार्धक्यावस्थेत निरीक्षणात येणाऱ्या
सर्व अंतस्थ व बाह्य लक्षणांचा समावेश होतो. सांसर्गिक रोग,
अपघात, निकस आहार, विषम हवामान व प्रतिकूल
वातावरणासारख्या स्थितीत शरीररूपी यंत्रावर अधिक ताण
पडल्याने त्याची अधिक झीज होऊन त्यात वार्धक्याची चिन्हेही
लवकर दिसू लागतात. स्त्रियांचे जीवन पुरुषांच्या मानाने कमी
धकाधकीचे असल्याने त्यांच्या शरीराची झीज कमी होते. त्या
अधिक दिवस (सरासरी ६ वर्षे) जगतात, असेही निरीक्षणात
आले आहे.

(२) घटलेले तापमान

_ वार्धक्याचा आणि शरीरातल्या उष्णतेचा निकटचा संबंध
आहे. पण कमी उष्णतामानामुळे वार्धक्याची चिन्हे उद्भवतात
की कमी उष्णतामान हेच वार्धक्याचे एक लक्षण आहे, हे नक्की
सांगता येत नाही. एवढे मात्र खरे की, म्हातारपणात शरीराचे
उष्णतामान तारुण्यावस्थेच्या तुलनेने नि:संशय कमी असते.
चेलसी येथे वृद्ध सेवानिवृत्तावर केलेल्या संशोधनात त्यांचे
तापमान ३५ सें. (१५ फॅ.) च्या आसपास असल्याचे दिसून
आले आहे. या निरीक्षणासाठी, नेहमीच्या वापरातल्या
तापमापक नलिकेत ३५ सें. इन कमी उष्णता मोजता येत
नसल्याने विशिष्ट प्रकारची तापमापके वापरावी लागली होती,
असे सांगण्यात येते की, वृद्धांच्या शरीरात उष्णता निर्मितीचे
कारण शरीर पेशीतल्या एन्झाइम (Enzymes) विकर
द्रव्यांच्या कार्यक्षमतेत घडणारा बदल होय. म्हाताऱ्या लोकांवर
हजारो प्रयोग करून त्यांनी सिद्ध केले आहे की, वृद्धांच्या
पेशीतील एन्झाइम विकर शरीराला सुव्यवस्थित ठेवण्यास
आवश्यक असणारी रासायनिक द्रव्ये बनवू शकत नाहीत व
अशा प्रकारे म्हातारपणीच्या लक्षणांच्या निर्मितीस कारणीभूत
होतात. उदाहरणार्थ, जरठ अवस्थेत शरीराची प्रथिने आणि
रोग प्रतिबंधक रसायने बनविण्याची शक्ती कमी होते. यामुळे
शरीराची झीज पूर्णपणे भरून निघत नाही व संसर्गजन्य रोग
झाले असता जंतूशी लढण्यास ते वृद्ध शरीर असमर्थ ठरते.
म्हातारपणाचे हे एक प्रमुख लक्षण आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते शरीर पेशीतल्या एन्झाइमांच्या
कार्यात वृद्धापकाळी एकाएकी बदल घडून येतो व तो आपल्या
सभोवतालच्या पेशीनांच मारक ठरतो. अशा प्रकारे पुष्कळ
पेशी नष्ट होतात. या स्थितीला संशोधकांनी शरीरजन्य
रक्षणशक्ती (Auto-immunity) ही संज्ञा दिली आहे. काही
प्रसंगी एन्झाइम एखादे नवे घातक रसायन तयार करूनही ते
कार्य करीत असल्याचे दिसून आले आहे.
प्रमाण सारखेच असते, पण त्यांच्या अंगातून अधिक उष्णता
बाहेर पडत असल्याने त्यांचे तापमान कमी भरते.

(३) म्हातारपण एक आजार

बफेलो विद्यापीठाच्या डॉ. शिलास यांच्या मते,
वृद्धावस्था हा शरीराला ग्रासणाऱ्या इतर सर्व आजारांसारखाच
एक आजार आहे. हा तिशीच्या सुमारास गुप्तरित्या शरीरात
प्रवेश करतो. पुढे हळूहळू वाढत जाऊन, मनुष्य इतर आजार
व अपघात यांच्या तडाख्यातून वाचून राहिल्यास, शेवटी
म्हातारपणाच्या सर्व लक्षणांनिशी प्रकट होतो. या रोगाने
शरीरात निर्माण होणाऱ्या विकृती शरीरपेशीच्या
निकृष्टीभवनामुळे (Degenerative Process) उद्भवतात.
असा अंदाज लावण्यात आला आहे की, ३५ वर्षे वयानंतर
दररोज मेंदूतल्या सुमारे एक हजार पेशी नष्ट पावतात. नष्ट
झालेल्या मज्जापेशींची पुनरनिर्मिती होत नसल्याने, मेंदूमध्ये
त्यांची संख्या कमी कमी होत जाते. कालांतराने या उणिवेमुळे
मेंदू क्षीण होतो आणि बुद्धी मंद झाल्याने म्हातारपणाच्या या
लक्षणामुळे ‘साठी बुद्धी नाठी’ ही म्हण सार्थ ठरू लागते.
शरीरातल्या इतर इंद्रियांतही पेशीचे निकृष्टीभवन होत असते
आणि त्यातून जरठ रोगाच्या इतर लक्षणांचा प्रादुर्भाव होतो.

(४) विशिष्ट अंत:स्त्राव

कीटकवर्गात केवळ एखाद्या ग्रंथीरसाच्या नावाने त्यांच्या
शरीराचे संपूर्ण परिवर्तन होत असल्याचे दिसून येते. मनुष्य
तारुण्यावस्थेत पदार्पण करीत असताना त्याच्या अँटीरियर
पिट्युटरी (Anterior Pituitary) ग्रंथीतूनही विशिष्ट ग्रंथीरस
तयार होतो आणि त्यामुळे त्याच्या शरीरात परिवर्तन घडून
त्याला तारुण्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे, एकदा का माणसाचे
प्रजोत्पादनाचे कार्य पार पडले की, निसर्गाला शरीराची गरज
उरत नाही आणि पुन्हा एकदा मानवी शरीराच्या एका विशिष्ट
ग्रंथीतून अंत:स्त्राव होऊन परिवर्तन घडते व वृद्धत्वाची स्थिती
उत्पन्न होते असे न्यूजींच्या डॉ. डेनक्ला यांचे ठाम मत आहे.
___ थाइरॉइड (Thyroid) ग्रंधीरसाच्या कमरतेने मानवी
शरीरात उत्पन्न होणारी लक्षणे बहुतांशी वार्धक्यावस्थेत दिसून
येणाऱ्या लक्षणांसारखीच असतात. यामुळे डॉ. डेनक्लांना असे
वाटते की, वृद्धापकाळी मनुष्याच्या शरीरात बदल घडवून
आणणारा तो विशिष्ट रस शरीरपेशी घटक संघावर परिणाम
करतो व त्यांना अत्यावश्यक असणाऱ्या थाइरॉईड ग्रंथीरसाला
तो रक्तात योग्य प्रमाणात असतानाही वापरू देत नाही.
या घातक अंतःस्त्रावचे डॉक्टर महाशयांनी “डेथ हॉर्मों
(Death Hormone) असे नामाभिधान केले आहे, पण
त्यांचा हा शोध अजून पूर्ण झालेला नाही.

(५) एन्झाइमांच्या कार्यात बदल

जीवरसायन शास्त्रज्ञांच्या मते, म्हातारपणाचे मुख्य
कारण शरीर पेशीतल्या एन्झाइम (Enzymes) विकर
द्रव्यांच्या कार्यक्षमतेत घडणारा बदल होय. म्हाताऱ्या लोकांवर
हजारो प्रयोग करून त्यांनी सिद्ध केले आहे की, वृद्धांच्या
पेशीतील एन्झाइम विकर शरीराला सुव्यवस्थित ठेवण्यास
आवश्यक असणारी रासायनिक द्रव्ये बनवू शकत नाहीत व
अशा प्रकारे म्हातारपणीच्या लक्षणांच्या निर्मितीस कारणीभूत
होतात. उदाहरणार्थ, जरठ अवस्थेत शरीराची प्रथिने आणि
रोग प्रतिबंधक रसायने बनविण्याची शक्ती कमी होते. यामुळे
शरीराची झीज पूर्णपणे भरून निघत नाही व संसर्गजन्य रोग
झाले असता जंतूशी लढण्यास ते वृद्ध शरीर असमर्थ ठरते.
म्हातारपणाचे हे एक प्रमुख लक्षण आहे.
काही शास्त्रज्ञांच्या मते शरीर पेशीतल्या एन्झाइमांच्या
कार्यात वृद्धापकाळी एकाएकी बदल घडून येतो व तो आपल्या
सभोवतालच्या पेशीनांच मारक ठरतो. अशा प्रकारे पुष्कळ
पेशी नष्ट होतात. या स्थितीला संशोधकांनी शरीरजन्य
रक्षणशक्ती (Auto-immunity) ही संज्ञा दिली आहे. काही
प्रसंगी एन्झाइम एखादे नवे घातक रसायन तयार करूनही ते
कार्य करीत असल्याचे दिसून आले आहे.

(६) म्हातारपण आनुवंशिक ?

दीर्घायुषी मातापित्यांची संतती अपघात अथवा अन्य
आजाराने मृत्यू न पावल्यास दीर्घायुषी निपजते. तसेच वाढत्या
वयाबरोबर शरीर पेशींतल्या रंगसूत्रातल्या डी.एन.ए.
(D.N.A.) रेणूंमध्येही बदल होतो यावरून दीर्घायुष्य आणि
वार्धक्याचा आनुवंशिकतेशी जवळचा संबंध असल्याचे दिसते.
डी.एन.ए. रेणूंमध्ये शरीराची सर्व आनुवंशिक माहिती
साठवलेली असते आणि ती आर.एन.ए. रेणूंकरवी प्रत्येक
पेशीला कळविण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत असतात. अशा
प्रकारे डी.एन.ए. रेणूंचा शरीराच्या सर्व क्रियांवर अप्रत्यक्षरित्या
अंमल चालतो.


वंशशास्त्रदृष्ट्या एखाद्या व्यक्तीचे शरीर किती वर्षांपर्यंत
कार्यक्षम राहावे व शरीराच्या पेशीत वृद्धावस्थेचे बदल केव्हा
घडावेत यासारखी विशिष्ट माहितीही या डी.एन.ए.-
आर.एन.ए, रेणूंच्या सांकेतिक भाषेत जन्मत:च नोंदलेली असते.
वाल्मिकी ऋषीनी रामायणाचा ग्रंथ आधी लिहिला व नंतर
त्याबरहुकूम सारे रामायण घडले. तद्वत प्रत्येक शरीराच्या
घटनांचे रामायण त्यांच्या या रेणूंत आधीपासून लिहिलेले असते
आणि आयुष्यभर जे घडते ते त्याला अनुसरूनच.
– आईबापांच्या आयुर्मानाचा परिणाम त्यांच्या संततीवर
होत असल्याचे अनेक मानवेतर प्राण्यांवर केलेल्या प्रयोगाने
सिद्ध ताले आहे.

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "माणसाला वृद्धत्व का येते ?|म्हातारपणाची 6 लक्षणे|old age |"

आपले मत कळवा