प्रेम|10 True love signs|How to Identify True Love?

प्रेम/True love
प्रेम की आकर्षक?

10 true love sign

प्रेम, की मोह ?

आमचे एकमेकांवर प्रेम आहे नि त्यासाठी आम्ही
विवाहबद्ध होण्याचे ठरवले, असे जेव्हा म्हटले जाते, त्या वेळी
‘प्रेम’ व ‘मोह’ ह्यांतील फरकच कित्येकांना कळलेला नसतो.

तेव्हा ह्या दोन भावनांचा खरा अर्थ प्रत्येक तरुण-तरुणीने जाणून
घेतला पाहिजे. प्रेम व मोह या दोन अभिव्यक्तींमध्ये काटेकोर
फरक करणे फार अवघड आहे. कारण ह्या दोन्ही मानवी भावना
एकमेकांना पूरक असू शकतात. ‘प्रेमात पडलो आहे’, असे
वाटणाऱ्या व्यक्तीने थोडे वस्तुनिष्ठ होऊन आत्मनिरीक्षण केले,
तर स्वतःची व दुसऱ्याचीही फसगत होणार नाही.

(१) प्रेम निर्माण होण्यास आणि ते वृद्धिंगत होण्यास काही
काळ जावा लागतो, तर मोहात मात्र मनुष्य चटकन पडतो.

(२) एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडण्यास त्या व्यक्तीच्या अनेक
गुणांचा परिचय व्हावा लागतो. विविध प्रसंगांच्या वेळी
त्या व्यक्तीचा सहवास घडला तरच त्याची खरी पारख
होण्याची शक्यता असते.

(३) व्यक्तीच्या सवयी, प्रवृत्ती, गुण-दोष माहिती नसतानाही
एखाद्या व्यक्तीबद्दल प्रथमदर्शनी आकर्षण वाटू शकते.
त्या व्यक्तीबद्दल मोह निर्माण होऊशकतो व त्या व्यक्तीचा
सहवास हवासा वाटू लागतो; पण ते खरे प्रेम नव्हे, ते
टिकाऊ ठरण्याची शक्यता कमी असते.

(४) संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविल्याशिवाय व अनेक बरे-
वाईट पैलू समजल्याशिवाय स्थिर प्रेम जडू शकत नाही.
असे म्हणतात.

एखाद्या व्यक्तीचे शरीरसौष्ठव, सौंदर्य किंवा संगीत,
साहित्य, नाट्य, वक्तृत्व व खेळ ह्यांमधील कुठल्याही
एक वा अनेक कलांमधील प्रावीण्य, तसेच सामाजिक व
राजकीय क्षेत्रांतील कर्तृत्व ह्यांपैकी कुठल्याही एका
गुणवैशिष्ट्यावर भाळून त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू
लागते, त्याला मोहात पडणेच म्हणावे लागेल.

खऱ्या प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला
पूर्णाशाने आदर्श असे मानत नाही; तर मोहात पडलेली
व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीच्या गुणावगुणांची चिकित्सा ।
न करता व त्याचा पडताळा न पाहता ती व्यक्ती पूर्ण
आदर्श आहे, असे धरून चालते.

प्रेमात पडलेली व्यक्ती दुसऱ्याच्या हिताचाही विचार
करते. आपण काय देऊ शकू, ह्याचाच जास्त विचार
करते. तर मोहात पडलेली व्यक्ती दुसऱ्याच्या संपूर्ण अधीन
होते, स्वतंत्र विचार करण्याची शक्तीच गमावून बसते नि
पुढे खरे स्वरूप उघडे झाल्यावर निराश होते. मोहात
पडलेली व्यक्ती नेहमीच दिवास्वप्नातरंगून गेलेली असते,
असे आढळून आले आहे.

एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे हे नैसर्गिक आहे,
परंतु नुसत्या बाह्यरूपाला / दिखाऊपणाला भुलून चालणार
नाही. ‘जसे दिसते, तसे नसते, म्हणून जग फसते’ हे विसरून
चालणार नाही. आपल्याला स्वतःचे व दुसऱ्याचे स्वभावधर्म व
गुण-दोष ओळखता आले पाहिजेत. एवढे खरे, की जे गुण-दोष
आपल्याला दुसऱ्यात दिसतात, स्वभाववैशिष्ट्ये आवडतात किंवा
नावडतात, तेच दुसऱ्याला त्या व्यक्तीत दिसतील किंवा
भावतीलच असे मात्र नाही. तो प्रत्येकाच्या प्रकृतीचा एक भाग
असू शकेल. शरीराबरोबर मनही सुंदर व निकोप हवे. आपण
शोधलेला मित्र वा शोधलेली मैत्रीण आपल्या अनुरूप आहे की
नाही हे स्वतःलाच पुढील प्रश्न विचारून स्वतःचे उत्तर शोधा.

(अ) ती व्यक्ती आपल्या स्वतःच्या कुटुंबीयांशी कसे
वागते?

(आ) ती व्यक्ती स्वार्थी, आत्मकेंद्रित कितपत आहे?

(इ) आपल्या मनाजोगे कुणी वागत नसतील किंवा
आपल्या मनाजोग्या गोष्टी घडत नसतील, तर ती
व्यक्ती चीडचीड करून अस्वस्थ होते का?

(ई) ती व्यक्ती शीघ्रकोपी आहे का?

(उ) कुणी टीका केली तर ती व्यक्ती ती टीका खिलाडू
वृत्तीने स्वीकारते का? वस्तुतीने हुरळून तर जात
नाही ना?

(ऊ) दुसऱ्यावर स्वामित्व गाजविण्याची प्रवृत्ती त्या
व्यक्तीत असल्यास, किती प्रमाणात अशी वृत्ती
आहे असे वाटते?

(ए) दुसऱ्याशी वागताना त्या व्यक्तीत ही वृत्ती
आढळून येते का ? त्या व्यक्तीच्या मनाचा
दिलदारपणा जाणवतो का?

एकमेकांच्या सहवासात खरेच दोघे ‘विसावू’

शकतात का?

आपल्या जोडीदाराची निवड करण्याची संधी ज्या
व्यक्तीला मिळेल, त्या व्यक्तीने पुढे दिलेल्या काही समान तत्त्वांचा
विचार करणे योग्य होईल,

(१) दोघांची कोणती जीवनमूल्ये समान आहेत ?

(२) तुम्हांस तुमच्या जोडीदाराबद्दल आदर वाटतो का?

(३) दोघांच्या बुद्धिमत्तेत फार तफावत आढळत नाही ना?

(४) संपूर्णतः परावलंबी व्यक्तिमत्त्वाची निवड करणे तुमच्या
स्वतःच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल का?

(५) दुसऱ्याला विवाहानंतर सुधारू शकू, ह्या आशेवर तर
आपण विसंबून नाही ना ? (विशेषतः व्यसनाधीन
असलेल्या व्यक्तीला)

(६) पितृवत प्रेम करणारा एखादा पुरुष हवा, म्हणून तर पतीचा
स्वीकार केला जात नाही ना? किंवा मातृवत प्रेम करणारी
स्त्री हवी, म्हणून पत्नीचा स्वीकार केला जात नाही ना?

(७) तुमच्याशी संपूर्णतः भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीशी
विवाह करीत नाही ना?

(८) अस्थिर व्यक्तिमत्त्व असलेल्याची जोडीदार म्हणून निवड
केल्याने अनेक व्यावहारिक अडचणींना तोंड द्यावे लागते,
ह्याची पूर्ण जाणीव आहे ना?

पुढील माहिती मिळविणे उपयोगी ठरेल.

(अ) दुसऱ्या व्यक्तीचा मित्रपरिवार कशा प्रकारचा
आहे?
(आ) तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मित्र-मैत्रिणींचे
किंवा कुटुंबीयांचे काय मत आहे? .

(९) ज्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करावयाची, त्या
व्यक्तीच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक
पातळीवर काही साधर्म्य आहे का?

(१०) अर्थार्जन करणारी किंवा घराबाहेरच्या कामात, कार्यात
वेळ घालवू इच्छिणारी पत्नी किंवा घराबाहेरच्या नोकरी,
व्यवसाय, सार्वजनिक कार्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून
देणारा पती ह्यांमुळे वैवाहिक जीवनात अनेक प्रश्न, समस्या
निर्माण होऊ शकतात, त्याचा विचार केला आहे का?

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "प्रेम|10 True love signs|How to Identify True Love?"

आपले मत कळवा