कोरोना व्हायरस डोनेशन लिस्ट- या व्यक्तींनी केले करोडो रुपये दान!

कोरोना व्हायरस डोनेशन
कोरोना व्हायरस डोनेशन लिस्ट

कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. जगातील जवळपास सगळेच देश या महामारीशी लढताय. जो तो देश आपापल्या परीने या कोरोना व्हायरस सोबत दोन हात करत आहे. त्याचबरोबर आनंदाची गोष्ट म्हणजे अनेक देशांतील व्यति, कंपन्या, संस्था स्वतः पुढे येऊन भरभरून दान करताय. कोरोना व्हायरस शी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या सोई सुविधा उपलब्ध करून देताय.आतापर्यंत या सगळ्यांनी जवळपास करोडो रुपये दान केलेले आहेत.

फॉर्ब्ज या मासिकाच्या म्हणण्यानुसार जगभरातील विविध दानशूर लोकांनी जवळजवळ 8 लाख करोड रुपयांपेक्षा जास्तची रक्कम दान केलेली आहे.


इतर देशांप्रमाणे भारतातही दानशूर लोकांनी संख्या कमी नाहीये. भारतातील अरबपती सुध्दा करोडो रुपयांची मदत करताना दिसत आहेत.


कोरोना व्हायरस च्या लढाईत सरकारला मदत म्हणून केली जाणारी ही रक्कम विविध प्रकारचे वैद्यकीय सुविधा खरेदी करण्यासाठी आणि अजून इतर कामांसाठी वापरली जात आहे.


भारतातील प्रसिद्ध महिंद्रा ग्रुप चे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मदतीची घोषणा केल्यानंतर अनेक लोकं मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. वेदांत ग्रुप चे चेयरमन अनिल अग्रवाल आणि पेटीएम चे संस्थापक विजय शर्मा यांनी सुद्धा मदतीची घोषणा केली.वेदांत ग्रुप चे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी या महामारीशी लढण्यासाठी 100 करोड रुपये देण्याची घोषणा केली. तर पेटीएम चे संस्थापक विजय शर्मा यांनी कोरोना व्हायरसची लस व त्यावरील औषधे निमिर्तीसाठी 5 करोड रुपये देण्याची घोषणा केली. यापुढेही गरज पडल्यास अधिक मदत करू असेही ते म्हणाले.


महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सांगितले की ते आपला पूर्ण पगार यासाठी दान देत आहेत. त्याच्याबरोबर त्यांनी इतरांना पण मदतीचे आव्हाहन केले आहे. आणि पुढच्या ते अजून मदत करणार आहेत याचाही त्यांची घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्विटर वरून या सगळ्या परिस्थिती वर ट्विट केली की “विविध रिपोर्ट नुसार भारत हा या महामारीच्या स्टेज 3 मध्ये प्रवेश करत आहे. आणि पुढेही अजून जास्त वेगाने पसरू शकतो आणि लाखो लोकं यापासून संक्रमित होऊ शकतात. आणि याचा ताण भारतातील वैद्यकीय क्षेत्रावर पडू शकतो.”पेटी एम चे संस्थापक विजय शर्मा यांनी ट्विट करून सांगितलं की भारतात व्हेंटिलेटर ची संख्या कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी 5 करोड रुपये देतील.मायक्रोसॉफ्टचे फाउंडर बिल गेट्स यांनी त्यांच्या फाउंडेशन तर्फे कोरोना व्हायरसवर लस बनवण्यासाठी आणि आशिया व आफ्रिकेत उपचारासाठी 750करोड रुपये देण्याची घोषणा केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याआधीही त्यांनी 1 करोड डॉलर दिली होते.

अलिबाबा ग्रुपचे फाउंडर जैक मा यांनीही कोरोना व्हायरस ची लस निर्मितीसाठी 100 करोड रुपये दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेला 5 लाख टेस्टिंग किट आणि 10 लाख मास्क सुद्धा पाठवले आहेत.

जगातील अनेक फुटबॉलरांनी या व्हायरसच्या उपचारासाठी 50 करोड रुपये दान केले आहेत. अमेरिकेतील नेशनल बास्केटबॉल असोसिएशन यांनी फंड गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. या असोसिएशने आतापर्यंत 300 करोड रुपये दान केले आहेत.


इटलीत सर्वात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीत 18 अब्जाधीशांनी कोरोना व्हायरस चे उच्चटना करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 250 करोड रुपये पेक्षा जास्त रक्कम दान केली आहे. त्याच बरोबर फॅशन लिजेंड अरमानी यांनी मीलान आणि रोम च्या दवाखान्याना उपचारासाठी 10 करोड रुपयांची मदत केली आहे.
हाँग काँग चे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ली कांग शिंग यांनी व्यूहान च्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 98 करोड रुपयांची मदत केली आहे. यू एस चे पॉप स्टार रिहाना यांनी व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी 10 करोड रुपये दान केले आहेत.


भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल सीआरपीएफने गुरुवारी जाहीर केले की, कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराविरूद्धच्या लढ्यात पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत त्यांचे 3.5. lakh लाखाहून अधिक कर्मचारी त्यांच्या एका दिवसाचा पगार देणार आहेत. ही एकूण रक्कम 33 करोड 81 लाख इतकी आहे.

साउथ सुपरस्टार रजनीकांत हे पहिले मानकरी होते ज्यांना रोजंदारी कामगारांना मदत करण्यासाठी 50 लाख रुपयांची देणगी देऊन पुढे आले.

बॉलिवूडमध्ये हृतिक आणि कपिल मदत कार्यात निधीसाठी पुढे आले.हृतिक रोशन, प्रभास, महेश बाबू आणि कॉमेडी टीव्ही स्टार अभिनेते कपिल शर्मा यांनी गुरुवारी वचन दिले की देशातील सध्याच्या कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी मदत आणि निधी यासाठी देणगी देण्यात येईल. यांनी सांगितले की त्यांनी बीएमसी कामगारांसाठी मास्क खरेदी केले आहेत. कपिलने जाहीर केले की तो देशातील कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान रिलीफ फंडामध्ये 50 लाख रुपयांची मदत देत आहे. हृतिकने ट्विट केले आहे की, “अशा वेळेस आपल्या शहर व समाजातील सर्वात मूलभूत काळजीवाहूंच्या सुरक्षेसाठी आपण जे काही करू शकलो ते करणे आवश्यक आहे. मी आमच्या बीएमसी कामगारांसाठी एन 95 आणि एफएफपी 3 मास्क खरेदी केले आहेत.”


कोविड -19 रिलीफ फंड मध्ये प्रभासने चार कोटी रुपयांची देणगी दिली.“बाहुबली” च्या अभिनेत्यांनी पंतप्रधान मदत निधीला 3 कोटी आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचे वचन दिले आहे.

अभिनेता महेश म्हणाले की, त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.

पवन कल्याण आणि राम चरण यांच्यासह दक्षिणेकडून आलेल्या अनेक अभिनेत्यांनी पैसे दान केले आहेत. अभिनेता पवन कल्याण यांनीही ट्विटरवर जाहीर केले की ते पंतप्रधान मदतनिधीला एक कोटी रुपये देणार आहे.
“अश्या संकटमय काळात मा.श्री.नरेनद्रमोदी जी यांना पाठिंबा देण्यासाठी मी पंतप्रधान मदतनिधीला एक कोटी रुपये देणार आहे. असे पवन कल्याण यांनी ट्विटरवर लिहिले आहे. “कोरोना साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी मी आंध्र प्रदेश आणि तेलंगानाच्या मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 50 लाख रुपये देणार आहे.” असे त्यांनी सांगितले.पवन कल्याणच्या प्रेरणेने चरण यांनीही पुढाकार घेऊन, सध्या चालू असलेल्या आरोग्याच्या संकटाला मदत करण्यासाठी ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या पीएमओ आणि राज्य सरकारांना त्यांनी 70 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले.

सेलेब्रिटी करण जौहर, नितेश तिवारी, आनंद एल राय, आयुष्मान खुराना, तप्सी पन्नू, सोनम कपूर, भूमी पेडणेकर, दीया मिर्झा यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने एका नव्या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला आहे.

पीव्ही सिंधू यांनी कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आधीच सहा महिन्यांचा पगार हरियाणा कोरोना व्हायरस मदत निधीसाठी दिला आहे.टेनिस स्टार सानिया मिर्झाने कोरोना।व्हायरस साथीच्या आजारात रोजंदारीवरील मजुरांना अन्न व इतर मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी पुढे सरसावले आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनने पश्चिम बंगाल सरकारच्या आपत्कालीन मदत निधीसाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. अध्यक्ष अविशेक डालमियायांनी स्वतः खिशातून आणखी 5 लाखांची मदत केली आहे.

इंटरनेशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज, आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन आणि इंडियन फिल्म अँड टीव्ही इंडस्ट्री या संघटनांनी सुरू केलेला ‘आय स्टँड विथ ह्युमॅनिटी’ दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांना 10 दिवस आवश्यक अन्न पुरवठा करणार आहेत.

कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदार आणि आमदारांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना वायरस सहायता निधी म्हणून राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत दान करणार आहेत.

सचिननेही करोनाविरुद्ध लढ्यात सरकारी यंत्रणांना आर्थिक मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधी आणि पंतप्रधान सहायता निधीला प्रत्येकी २५ लाखांची मदत केलेली आहे. सचिन व्यतिरीक्त मुंबई क्रिकेट संघटनेनेही मुख्यमंत्री सहायता निधीला ५० लाखांची मदत केली आहे. परिस्थिती बिघडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदानं वैद्यकीय सुविधेसाठी खुली करण्याची तयारीही MCA ने दाखवली आहे.

आतापर्यंत पी.व्ही.सिंधू, गौतम गंभीर, बजरंग पुनिया, इरफान-युसूफ पठाण, महेंद्रसिंह धोनी, सानिया मिर्झा या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात मदत केली आहे.

कोरोनव्हायरसच्या उद्रेकाविरूद्ध राज्य सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी, टीआरएसने निर्णय घेतला आहे की त्याचे सर्व खासदार, आमदार आणि एमएलसी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीत एक महिन्याचा पगार मदत म्हणून देतील. याशिवाय ते मुख्यमंत्री निधीत एक वर्षाचा मतदारसंघ विकासनिधी देखील देणार आहेत. एकूण रक्कम 500 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "कोरोना व्हायरस डोनेशन लिस्ट- या व्यक्तींनी केले करोडो रुपये दान!"

आपले मत कळवा