आरोग्य सांभाळा|या 10 सवयी पाळा|आजारांपासून दूर रहा!|Health tips|

आयोग्य | Health tips in marathi
Image source -ycmou book

आरोग्य सांभाळा – या 10 सवयी पाळा आणि आजारांपासून दूर रहा!


1 आरोग्यम् धनसंपदा-

आरोग्य ही एक धनसंपदाच आहे. म्हणजेच निरोगी शरीर हे सर्व संपत्तीपेक्षा अधिक
महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्याची त्रिसूत्री म्हणजे कार्यक्षमता, आनंद आणि दीर्घायुषी असणे,
यासाठी तन व मन दोन्ही निरोगी असणे आवश्यक आहे. तसेच आपले व समाजाचे नाते
निरोगी असायला पाहिजे. अनेक लोकांना वाटते की आरोग्य म्हणजे फक्त औषधे, डॉक्टर
व रुग्णालये. पण हे खरे नाही.आपण आजारी पडतो तेव्हा औषधे, डॉक्टर व रुग्णालये यांची गरज भासते. पण
प्रथम आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण रोग टाळू शकतो, आरोग्याचे
रक्षण करू शकतो व आयुष्य लांबवू शकतो. आरोग्य हीच खरी श्रीमंती.

आरोग्याने आपली काम करायची शक्ती वाढते.याउलट अनारोग्याने आपले नुकसान होते.

अनारोग्यामुळे आपल्याला कामापासून व उपजीविकेपासून वंचित राहावे लागते.

अनारोग्यामुळे औषधे व डॉक्टर यांवरील खर्च वाढतो. अनेक लोक नाईलाजाने कर्ज काढून

किंवा गुरे, शेळ्या इ. विकून हॉस्पिटलचे बिल भरतात, तंबाखू व दारूवर खर्च होणाऱ्या पैशानेही

अनारोग्य वाढते. आरोग्यदायी सवयींमुळे उत्पादकता वाढते, आपली उपजीविका व संपत्ती सुरक्षित राहते.


२. आरोग्य व अनारोग्याची कारणपरंपरा

आरोग्य काही अंशी आनुवंशिकतेने येते. आरोग्याच्या काही समस्याही आनुवंशिक
असतात. रक्ताच्या नात्यातील व्यक्तींशी विवाह टाळून आपण काही आजार (उदा.
रक्तस्रावाचा एक प्रकार – हिमोफिलिया) समस्या टाळू शकतो.
तसेच अनेक सामाजिक व आर्थिक समस्याही अनारोग्यास कारणीभूत ठरतात.
अनेक रोगांचे मूळ गरिबीत सापडते. गरिबीत पुरेसा व चौरस आहार मिळू शकत नाही.

गरोदरपणात किंवा बाळंतपणात स्त्रियांना काही आजार होऊ शकतात. आपल्याकडे
स्त्रियांचे आजार नेहमीच किरकोळ समजले जातात. त्यावरही इलाज जेमतेमच केला जातो.गरिबीमुळे आरोग्य सेवांचा वापरही अपुरा होतो. अज्ञानानेही आजारपण वाढीस लागते.
काही पारंपरिक रीतिरिवाज आरोग्यासाठी घातक असतात. आपल्या गावातल्या अशा
चालीरीतींचाही आपण अभ्यास करावा.

 • आरोग्य या गोष्टींवर अवलंबून असते –
 • १) स्वच्छ हवा -पाणी
 • २) पोटभर अन्न, चौरस आहार
 • ३) आरोग्यदायी वागणूक आणि सवयी
 • ४) निरोगी घर आणि परिसर
 • ५) कामाच्या ठिकाणी चांगले वातावःग
 • ६) समजूतदार कुटुंब, मित्रमंडळी आणि सामाजिक सामंजस्य
 • ७) लसीकरण, कुटुंबनियोजन, मच्छरदाणीचा वापर अशा साधनांचा योग्य वेळी उपयोग
 • करणे हेही आरोग्यासाठी जरूरीचे आहे.

अनेक आजारांमध्ये लगेच औषधोपचार सुरू करणे फार महत्त्वाचे असते.उदा. टी.बी., कॅन्सर, उच्च रक्तदाब, न्यूमोनिया, सर्पदंश इ. अशा आजारांसाठी लवकर उपचार
महत्त्वाचे ठरतात,


३. आरोग्य व अनारोग्याचे मोजमाप

अनेकदा आपण म्हणतो की अपुक माणूस तमुक माणसापेक्षा अधिक निरोगी
दिसतो आनंदी वागण्यातूनही चांगले आरोग्य दिसून येते. पण हे झाले ढोबळ वर्णन.
आपण अनेकदा आरोग्याचे मोजमापही वापरतो,

उदाहरणार्थ : तरुण मुलामुलींची पोलिसात वा सैन्यात निवड करताना वजन,
उंची, छातीचा घेर अशा मोजमापांचा विचार केला जातो. तसेच अनेकदा आरोग्य
तपासण्याकरिता आपण डोळे, रक्त, लघवी अशा तपासण्याही करून घेतो.
अनारोग्याविषयीही असेच निकष लावता येतील. आपण अनारोग्याचा संबंध
आजारांशी जोडतो. खोकला, ताप, हगवण, टी.बी., पोलिओ, दारूचे व्यसन, वगैरे.

तसेच समूहाच्या आरोग्याबद्दलही आपण अशाच प्रकारे बोलतो. गावागावात जशी तुलना करता
येते तशीच जिल्ह्याजिल्ह्यांची तुलना करता येते. आपल्या महाराष्ट्रात आरोग्याच्या बाबतीत
काही जिल्हे तुलनेने इतरांपेक्षा बरे आहेत. आदिवासी जिल्ह्यात साहजिकच कुपोषण-
आजार-मृत्यू जास्त आहेत.अशीच तुलना भारतातल्या निरनिराळ्या प्रांतांची करता येईल.

निरनिराळ्या देशांचीही अशीच तुलना करतात.वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे, दात घासणे, आंघोळ करणे, स्वच्छ कपडे, बूट-चपला वापरणे, केसांची काळजी या सर्व घटकांचे आरोग्यासाठी महत्त्व
स्वच्छता म्हणजेच परमेश्वर असे म्हणतात.अनेक रोग अस्वच्छतेमुळेच पसरतात.
उदाहरणार्थ, हगवण, अतिसार, पटकी, जंत, टायफॉईड, कातडीचे रोग, उवा होणे,
दातांचे रोग वगैरे.


१. हगणदारी मुक्ती

भारतात अनेक लोक हागणदारीत, उघड्या शेताडीमध्ये संडासला जातात. याने
कोणीही स्वच्छ राहू शकत नाही. आपण त्यांना आरोग्यदायी संडास बांधून घेण्याकरता
मदत केली पाहिजे. तरुण मुली, महिला, म्हातारी माणसे, लहान मुले, आजारी व्यक्ती
अशांना उघड्यावर जाणे कठीण वाटते.त्यामुळे गावागावात प्रत्येक घरी शौचालय पाहिजेच.


२. हात स्वच्छ धुणे

संडास झाल्यावर स्वच्छतेकरता अनेक जण पाण्याचा वापर करतात. याने हाताला
जंतू चिकटतात, म्हणून मलविसर्जनानंतर साबणाने वा राखेने हात नीट धुतले पाहिजेत.
हगवण, टायफॉईड सारखे अनेक रोग घाण हातांमुळेच होतात. काहीही खाण्याच्या
आधी आपले हात स्वच्छ आहेत याची खात्री करणे जरुरीचे आहे. प्रथम साध्या पाण्याने
आणि नंतर साबण लावून हात धुऊन पाहा. धुतलेल्या पाण्यातील फरक तुमच्या लक्षात
येईल. मलविसर्जनानंतर आणि जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

आधी हात साध्या पाण्याने धुवा. नंतर हाताला साबण किंवा राख लावून नखांना,
बोटांच्या टोकांना व बोटांच्या मध्य चोळून साफ करा. हात पुन्हा पाण्याने धुवा. नॅपकिनने
किंवा स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करा. डॉक्टर व त्यांची सहायक मंडळी ऑपरेशनच्या
आधी असेच हात धुतात. नाहीतर जखम पिकण्याचा धोका असतो.
काही लोक संडासनंतर झाडाझुडपाच्या पानांनी किंवा कागदाने पुसतात. हे एकप्रकारे
चांगलेही आहे. कारण याने हाताला जंतू चिकटण्याची शक्यता कमी होते.


३. नखे कापणे

नखे नियमित कापल्याने मळ साचायला जागा राहत नाही. लांब नखे फॅशनेबल
दिसत असली तरी ती स्वच्छ न ठेवल्यास त्यात जंतू साठतात.


४. तोंड व दातांची स्वच्छता

दाताच्या फटींमध्ये नेहमी अन्नकण अडकतात. याने दातांचे आजार निर्माण होतात
तसेच हिरड्यांना सूजही येते.प्रत्येक जेवणानंतर स्वच्छ चुळा भरणे आवश्यक आहे.

यामुळे अडकलेले बरेच अन्नकण निघून जातील. एवढ्यानेही दात व हिरड्यांचे आजार

बरेच कमी होतील. रात्री स्वैपाक केलेली भांडी न धुता रात्रभर तशीच ठेवली तर काय होते?

त्याला घाण वास येतो. तसेच आपण जेवल्यावर तोंड न धुतल्यास तोंडाला घाणेरडा वास येईल.

सकाळी उठल्यावर तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ नये.कच्च्या किंवा भाजलेल्या

तंबाखूने दात घासू नये. त्याने दाताला डाग पडतात.

राखेचा वापर चालेल, पण त्याने दातातल्या फटी स्वच्छ होत नाहीत.फटी साफ होण्यासाठीब्रश किंवा दातवण लागते. तंबाखू लावणे मात्र आरोग्याला घातक आहे. विडी सिगरेट ओढल्यामुळेही दात खराब होतात.दात रोज घासल्याने ते निरोगी राहतात. ब्रशने नियमित दात घासल्यामुळे दातांवरील किटण निघून जाते. मऊ केसांचा ब्रश वापरावा. तो योग्य आकाराचा असावा. (मोठा असण्यापेक्षा लहान असणे चांगले) ब्रश दातावर आडवा ठेवावा. दात हिरड्यांच्या दिशेने खालीवर घासावेत. दात हलकेच घासावेत म्हणजे हिरड्यांखाली साठलेली घाण निघण्यास मदत होईल.

दातांच्या बाहेरून, जिभेच्या बाजूने व चावण्याच्या भागावर असे तीन बाजूंनी
दात घासावेत, शिळे अन्नकण व जंतू जिभेवर साठून राहिल्याने श्वासाला दुर्गंधी येऊ शकते.

जीभ साफ केल्याने श्वासाची दुर्गधी कमी होते. झोपण्याअगोदर व उठल्यानंतर असे किमान
दोन वेळा दात घासावेत, याने किटण साठण्यास आळा बसतो.

दात जास्त जोरात घासल्यास किंवा फार कडक ब्रश वापरल्यास हिरड्यांना इजा पोहोचू शकते. हिरड्यांना पण बोटाने मालिश करावी. ब्रशचे केस पसरट झाले असल्यास ब्रश बदलावा.

दात घासण्यासाठी टुथपेस्ट फार आवश्यक नसते. म्हणून नुसत्या ब्रशने दात
घासले तरी चालतात. मिठाचे पाणी किंवा त्रिफळा चूर्णही ब्रशबरोबर चालते.


५. दातवण

अनेक लोक दातवण म्हणजे कडूलिंबाची किंवा बाभळीची काडी वापरतात. ही
पद्धत चांगली आहे. त्या काडीचे टोक थोडे चावून मोकळे करावे. यामुळे ब्रशप्रमाणे दातातीलफटी स्वच्छ होतात. दातवणातील औषधी गुणांमुळे हिरड्या निरोगी राहतात.


६. रोजची आंघोळ

आपल्या देशामध्ये रोजची आंघोळ हे एक पवित्र कामच मानले जाते. आपल्या
धुळीच्या व उष्ण हवेत हे आवश्यकच आहे कारण घामाने शरीर घाण होत असते. (खूप थंड
प्रदेशात आंघोळीस एखादवेळेस बुट्टी मारली तरी चालते.) पाण्याचा वापर काटकसरीने
करायला हवा. काही लोकांना गरम पाणी आवडते. आंघोळीआधी तीळ किंवा मोहरीच्या
तेलाने मालिश केलेले चांगले असते. आंघोळीचे पाणी अतिशय गरम किंवा अति थंड असू
नये. रोजच्या कामाहून घरी आल्यावर घाम व धूळ काढून टाकण्याकरता हात, पाय व तोंड
पाण्याने स्वच्छ धुवावे, साबण, बेसनपीठ, मसूरडाळ पीठ यांपैकी परवडेल ते आंघोळीच्या
वेळी अंगाला लावावे.


७. स्वच्छ कपडे

कातडीचे रोग आणि उवा होणे टाळण्याकरता आतले आणि बाहेरचे कपडे स्वच्छ
असणे आवश्यक आहे. आंघोळीनंतर धुतलेले कपडे घालणे ही चांगली आरोग्यदायी सवय
आहे. एकमेकांचे कपडे न धुता घालू नये.


८. केसांची निगा

रोज केस विंचरणे हे केसांच्या आरोग्याकरता आवश्यक आहे. घामामुळे दुर्गधी येत
असल्यास केस धुणे आवश्यक आहे. शिकेकाई, रिठा व आवळा भिजवून त्यांच्या मिश्रणाने
केस धुणे हा चिकट व तेलकट केसांकरता सर्वात स्वस्त, सोपा व सुरक्षित मार्ग आहे.
उवांकरता बारीक फणी वापरणे आवश्यक आहे. इतरांचा कंगवा वापरणे शक्यतो टाळावे
म्हणजे उवांची लागण होणार नाही.काही प्रकारच्या साबणाने केस राठ आणि कोरडे होतात.
रोज साबण लावण्याची गरज नसते. कोरड्या आणि राठ केसांसाठी तेल लावावे.


९. चपला-बुटांनी पाय व आरोग्य चांगले राहतात

धुळीतील जीवजंतू आपल्या पायावर बसू नयेत याकरता योग्य प्रकारच्या चपला
किंवा बूट वापरणे आवश्यक आहे. खेड्यांमध्ये काही लोक अनवाणीच फिरतात. मुले
अनवाणी खेळतांना घाणीतले जंतू (विशेषतः कृमी) शरीरात शिरतात. पुढील पुस्तकांमधून
आपण या जंत व जंतूंविषयी अधिक माहिती घेणार आहोतच.

धूळ आणि गरम हवामानामुळे आपल्या पायांना भेगा पडतात. सर्वानी घराबाहेर
जाताना चप्पल किंवा बूट घालणे आवश्यक आहे. बूट जास्त चांगले. पायाला भेगा असल्यास
बूट अवश्य वापरावेत. चपला-बूट घराबाहेर काढण्याची भारतीय पद्धत योग्यच आहे.

यामुळे घरात स्वच्छता राहण्यास मदत होते. पायाला भेगा पडल्या असल्यास पाय गरम
पाण्याने धुऊन, आमसूल तेल (किंवा राळेचा मलम) लावल्यास लवकर आराम पडतो.

१०. तंबाखू, धूम्रपान नको

धूम्रपान, तंबाखू खाणे, वगैरे व्यसनांनी आरोग्याचे फार नुकसान होते. दात-तोंड
खराब होणे, श्वासाला घाण वास येणे, रक्तदाब, हृदयविकार, श्वसनविकार, पोटातल्या
गर्भाची वाढ कमी होणे, कर्करोग अशी नुकसानांची मोठी यादीच आहे. धूम्रपानामुळे जवळ
बसलेल्या इतरांनाही त्रास होऊ शकतो. भारतात आता सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला
बंदी आहे. पण चोरून-चुकूनही धूम्रपान व तंबाखू नकोच.

थोडक्यात स्वच्छतेसाठी या सवयी रोज आमलात आणा

 1. संडास वापरणे
 2. संडासनंतर हात धुणे, जेवणाआधी हात धुणे
 3. नखे कापणे
 4. तोंड व दातांची स्वच्छता
 5. आंघोळ
 6. स्वच्छ कपडे
 7. केसांची निगा
 8. चपला बूट वापरणे
 9. तंबाखू, धूम्रपान नको

About the Author

admin
मराठी न्यूज, आरोग्यविषयक माहिती, कथा, लैंगिक शिक्षण, सामाजिक, राजकीय, बुक्स रिव्ह्यू, त्याच बरोबर सामाजिकशास्र आणि समाजशास्रचा अश्या सर्व विषयांवर आधारित माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न.

Be the first to comment on "आरोग्य सांभाळा|या 10 सवयी पाळा|आजारांपासून दूर रहा!|Health tips|"

आपले मत कळवा